घरातली नकारात्मकता कमी करणाऱ्या ३ गोष्टी, घरात पॉझिटीव्ह वाटण्यासाठी आठवड्यातून एकदा 'हे' कराच..

Updated:April 28, 2025 19:15 IST2025-04-28T19:11:01+5:302025-04-28T19:15:51+5:30

घरातली नकारात्मकता कमी करणाऱ्या ३ गोष्टी, घरात पॉझिटीव्ह वाटण्यासाठी आठवड्यातून एकदा 'हे' कराच..

रोजच्यारोज आपल्याकडूनच काही चूका होतात आणि त्यामुळे मग घरात खूप निगेटीव्ह वाटायला लागतं (how to make our house positive?). त्यामुळेच जर आपण आपल्या वागण्यात काही बदल केले तर आपोआपच निगेटीव्ह वाटणारं घर सकारात्मक उर्जा देणारं होऊन जाईल.(3 tips to reduce negativity in house)

घरातली नकारात्मकता कमी करणाऱ्या ३ गोष्टी, घरात पॉझिटीव्ह वाटण्यासाठी आठवड्यातून एकदा 'हे' कराच..

ते बदल नेमके कोणते याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ krishna_bhanuse या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

घरातली नकारात्मकता कमी करणाऱ्या ३ गोष्टी, घरात पॉझिटीव्ह वाटण्यासाठी आठवड्यातून एकदा 'हे' कराच..

यामध्ये सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे आठवड्यातून एकदा तुमच्या घरातले निरुपयोगी सामान घराबाहेर काढा. बंद पडलेली घड्याळं, अन्य वस्तू एकतर दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. घरातला पसारा कमी करा. जेवढा पसारा कमी कराल तेवढं घर अधिक प्रशस्त, छान वाटेल.

घरातली नकारात्मकता कमी करणाऱ्या ३ गोष्टी, घरात पॉझिटीव्ह वाटण्यासाठी आठवड्यातून एकदा 'हे' कराच..

ही गोष्ट अगदी योग्यच आहे. कारण घरात जर खूप पसारा असेल, घर आवरलेलं, स्वच्छ, टापटीप नसेल तर आपोआपच घरात खूप अस्वस्थ होतं. पसारा पाहून चिडचिड होते, वैताग येतो. तेच जर तुम्ही स्वच्छ आवरलेल्या घरात बसला तर तुम्हाला छान प्रसन्न वाटतं. तिथे जास्त वेळ बसाव असं वाटतं..

घरातली नकारात्मकता कमी करणाऱ्या ३ गोष्टी, घरात पॉझिटीव्ह वाटण्यासाठी आठवड्यातून एकदा 'हे' कराच..

दुसरा उपाय म्हणजे घरात कायम सुगंध दरवळत असावा. यासाठी तुम्ही धूप, उदबत्ती, कापूर अशा गोष्टींचा वापर करू शकता किंवा रूम फ्रेशनर वापरू शकता. यामागचं साधं- सोपं लॉजिक असं की दुर्गंधी असणाऱ्या ठिकाणी आपण बसू शकत नाही. जिथे छान सुगंधी वातावरण असेल तिथे आपोआप मन रमतं. प्रसन्न वाटतं.

घरातली नकारात्मकता कमी करणाऱ्या ३ गोष्टी, घरात पॉझिटीव्ह वाटण्यासाठी आठवड्यातून एकदा 'हे' कराच..

तिसरा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा फरशी पुसण्याच्या पाण्यात रॉक सॉल्ट घालून त्याने फरशी पुसा. यामागचं विज्ञान असं की मीठ हे किटकनाशक आहे. मिठामुळे अनेक जंतू दूर होतात. त्यामुळे घर स्वच्छ होण्यासाठी, घरातले सुक्ष्म जंतू घालवून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा रॉक सॉल्टचा उपयोग करावा.. स्वच्छ, चकाचक घर असेल तर ते कोणालाही आवडतंच..