Join us

भाज्या खरेदी करताना या १० गोष्टी लक्षात ठेवा, किडक्या-खराब नको, आठवडाभर राहातील फ्रेश आणि ताज्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2025 14:05 IST

1 / 11
आठवड्याभराच्या भाज्या एकाच वेळी घेताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. भाज्या खरेदी करताना अनेकदा त्या ताज्या किंवा फ्रेश नसतात. (How to Buy Fresh Vegetables)
2 / 11
अनेकदा भाज्या खरेदी करताना आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे भाज्या काही दिवसातच खराब होतात. भाज्या खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या जाणून घेऊया. (Tips for Buying Fresh Produce)
3 / 11
बटाटे खरेदी करताना नेहमी गोल आणि चमकदार असायला हवे. हिरवे किंवा काळे डाग असणारे बटाटे घेणे टाळा, यात विषारी घटक असू शकतात. (Avoid Vegetable Spoilage)
4 / 11
भेंडी विकत घेताना ती लहान आणि मऊ असेल तर घ्या. मोठी आणि कडक भेंडी खाण्यास तंतुमय बनते. भेंडी ओळखण्यासाठी तिचे पुढचे देठ हलकेच तोडा. जर ती सहज तुटली तर ती ताजी आणि चांगली समजावी. (How to Choose Fresh Vegetables)
5 / 11
शिमला मिरची खरेदी करताना ती चार भागांची आहे का हे तपासा. तीन टोकाची शिमला मिरची अनेकदा कडू असते.
6 / 11
फ्लॉवर खरेदी करताना ती काळजीपूर्वक तपासा. यामध्ये काळे डाग, लहान कीटक किंवा पूर्ण उघडी ती नसायला हवी. हलक्या पिवळ्या रंगाची फ्लॉवर निवडा.
7 / 11
दुधी भोपळा ताजा आहे का हे तपासण्यासाठी तो हलका दाबून पाहा. भोपळ्याचा देठ हिरवा असेल तर तो ताजा आहे. फ्रेश नसेल तर पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
8 / 11
वांगी खरेदी करताना ती हलकी दाबून पाहा. जर मऊ आणि हलकी असतील तर त्यात बिया कमी असतात. खूप कडक आणि जड वांग्यांमध्ये बिया असतात, ज्यामुळे त्याची चव क़डू लागते.
9 / 11
कांदा खरेदी करताना तो गोल, कडक आणि कोरडा आहे का हे तपासा. फुटलेले किंवा ओले कांदे खरेदी करणे टाळा, यामुळे ते लवकर खराब होतात.
10 / 11
आपण टोमॅटो रोज वापरत असू तर लाल, पिकलेले टोमॅटो खरेदी करा. आठवडाभर वापरायचे असतील तर थोडे कच्चे किंवा हलके लाल टोमॅटो खरेदी करा, ते जास्त काळ टिकतील.
11 / 11
लिंबू खरेदी करताना तो रसाळ हवा असेल तर हलका दाबून पाहा. जर तो थोडा मऊ असेल तर त्यात जास्त रस असतो.
टॅग्स : सोशल व्हायरलकिचन टिप्स