By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:21 IST
1 / 10पांढऱ्या रंगाचे चिकनकारी ब्लाऊज (White Chikankari readymade blouse) हे भारतीय पेहरावातील सर्वात व्हर्सटाईल आणि ट्रेंडींग स्टाईलपैकी एक आहे. (White Chikankari readymade blouses)2 / 10पांढरा रंग न्युट्रल असल्यानं तो गडद, फिक्कट किवा मल्टीकल अशा कोणत्याही साडीवर उठून दिसतो. विशेषत: फ्लोरल प्रिंट्स किंवा काठाच्या साड्यांवर हे ब्लाऊज खूपच सुंदर दिसतात. 3 / 10चिकनकारी ही लखनौची प्रसिद्ध कला आहे. पांढऱ्या कपड्यांवर पांढऱ्या धाग्यानेच केलेले नाजूक नक्षीकाम ब्लाऊजला एक रॉयल लूक देते.4 / 10 रेडीमेड चिकनकारी ब्लाऊजमध्ये कॉटन, जॉर्जेट,सिल्क आणि शिफॉन असे विविध पर्याय उपलब्ध असतात. 5 / 10उन्हाळ्यासाठी कॉटनचे ब्लाऊज अतिशय आरामदायक ठरतात. हे ब्लाऊज बजेट फ्रेंडली असतात.6 / 10 ऑनलाईन स्टोअर्स किंवा स्थानिक दुकानांमध्ये तुम्हाला विविध मापांत हे ब्लाऊज उपलब्ध होतील.7 / 10 तुमच्याकडे एक पांढरं चिकनकारी ब्लाऊज असल्यास तुम्हाला प्रत्येक साडीसाठी वेगळे ब्लाऊज शिवण्याची गरज पडणार नाही.8 / 10या ब्लाऊजेसची फिटींगसुद्धा कम्फर्टेबल असते. रेडीमेड असल्यामुळे तुम्ही कमी-जास्त शिलाई करू शकता.9 / 10यात तुम्हाला हातांवर आणि बॅकवर फुलांच्या शेपमध्ये नेट असलेले ब्लाऊज डिझाईन्ससुद्धा मिळतील.10 / 10कॉटनची साडी असो किंवा शिफॉन, ऑर्गेंझा कोणत्याही साडीवर चिकनकारी ब्लाऊज उठून दिसेल.