By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:29 IST
1 / 10राजवाडी मंगळसूत्र (Rajwadi Mangalsutra) सध्या बरीच लोकप्रिय होत असून शाही लूकसाठी महिलांची पहिली पसंती मिळत आहे. (Wedding Season Special Rajwadi Mangalsutra Designs)2 / 10साडीवर ही मंगळसूत्र अत्यंत भरीव लूक देतात आणि शोभून दिसतात. राजवाडी मंगळसुत्रांमध्ये बरेच पॅटर्न्स तुम्हाला दिसून येतील. (Latest 10 Designs Of Rajwati Mangalsutra)3 / 10 या मंगळसुत्रांचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचे मोठे आणि कलाकुलर असलेले हेवी पेंडंट. ज्यावर नाजूक नक्षीकाम किंवा मिनाकारी असते.4 / 10साध्या पिळ्या धमक सोन्याऐवजी मॅट फिनिश किंवा एंटीक गोल्ड लूक असलेल्या राजवाडी डिझाईन्सना जास्त मागणी आहे.5 / 10यामध्ये पारंपारीक वाट्यांच्या कडांना झुमका स्टाईल, लहान मणी किंवा नाजूक घुंगरू जोडलेले असतात. यामुले त्याला अधिक उठाव येतो.6 / 10हे मंगळसूत्र सहजा २ ते ४ पदरी काळ्या मण्यांच्या जाड माळेत किंवा सोन्याच्या मण्यांच्या मिश्रणात उपलब्ध असते.7 / 10पेडंटमध्ये लाल किंवा हिरव्या रंगाचे खडे वापरून त्याला पॅटर्ननमुसार रंगत दिली जाते.8 / 10इमिटेशन किंवा १ ग्रॅम गोल्डमध्ये याची किंमत साधारण १ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहे.9 / 10सोन्याचे राजवाडी मंगळसुत्रांची किंमत वजनानुसार असते. साधारण १० ग्रॅमच्या पुढील वजनासाठी ९० हजार रुपयांच्या वर खर्च येतो.10 / 10हे मंगळसूत्र कोणत्याही पैठणी, नऊवारी किंवा काठपदर साडीवर विशेष शोभून दिसतात. जरी हे मंगळसूत्र दिसायला हेवी वाटत असले तरी १ ग्रॅम गोल्डमध्ये अनेक हलके पर्याय उपलब्ध आहेत.