By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:00 IST
1 / 11कितीही वेगवेगळ्या डिझाईन्सच्या बांगड्या घातल्या तरी हिरवा चुडा घालण्याचा आनंद काही वेगळाच असतो. लग्नसराईत हिरव्या चुड्याला बरीच मागणी असते. (Green Chuda Set (Hirva Chuda)2 / 11हिरव्या रंगाच्या बांगड्यांच्या आजूबाजूला गोल्डन कड्यांचे से्टस चुड्याला नवीन लूक देतात. (Green Bangles Set)3 / 11साध्या हिरव्या बांगड्यांऐवजी तुम्ही मोतीवर्क किंवा सोनेरी नक्षीकाम, टिकल्या किंवा ग्लिटर असलेल्या बांगड्यांना पसंती देऊ शकता.4 / 11 चुड्याच्या मध्यभागी कुंदनचे काम केलेले जाड कडे किंवा खड्यांच्या बांगड्या लावल्यानं हाताला एक रॉयल आणि भरगच्च लूक मिळतो. 5 / 11हिरव्या बांगड्यांच्या दोन्ही बाजूंना मोत्याची डिझाईन असलेले कडे जोडल्यानं कडा अधिक उठावदार दिसतो. जो विशेषत: लग्न समारंभासाठी लोकप्रिय आहे.6 / 11 काचेच्या बांगड्यांसोबत आता मेटलच्या हिरव्या बांगड्या आणि मखमली फिनिश असलेल्या बांगड्याही ट्रेंडमध्ये आहेत. ज्या टिकायला मजबूत असतात.7 / 11दक्षिण भारतीय पद्धतीची टेम्पल डिझाईन्सचे सोनेरी कडेही बांगड्यांसोबत एक पांरपाीरक आणि स्टायलिश लूक देतात.8 / 11 ज्यांना जास्त चमक आवडत नाही. त्यांच्यासाठी मॅट फिनिश असलेल्या गडद हिरव्या रंगाच्या बांगड्या सध्या खूपच चर्चेत आहेत.9 / 11हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक मानला जात असल्यानं सण-समारंभ अशा नवनवीन डिझाईन्सचा चुडा महिलांच्या सौंदर्यात अधिक भर घालतो.10 / 11तुम्ही जवळपासच्या नॉव्हेल्टी शॉपमधून किंवा वन ग्रॅम दागिन्यांच्या दुकानातून असे सुंदर डिझाईन्सचे कडे विकत घेऊ शकता.11 / 11काचेच्या बांगड्यांमध्येही तुम्हाला बरीच व्हरायटी दिसून येईल. या डिझाईन्सच्या बांगड्या तुम्ही लग्नकार्यात घालू शकता.