Join us
Daily Top 2 Weekly Top 5

व्हिक्टोरिया मंगळसुत्राच्या १० सुंदर डिजाईन्स, नाव वेगळं वाटतंय? पाहा नेमके दिसते कसे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:35 IST

1 / 10
व्हिक्टोरिया मंगळसूत्र (Victoria Mangalsutra) ही सध्यांच्या दागिन्यांच्या फॅशनमधील सर्वात मोठी ट्रेंडींग गोष्ट आहे. या मंगळसूत्रामध्ये व्हिक्टोरिया युगातील डिझाईन्सची झलक दिसते ज्यामुळे त्यांना एक शाही लूक येतो. (Victoria Mangalsutra Designs)
2 / 10
हे पेंडंट सहजा मोठे, उठावदार आणि किचकट कोरिव काम केलेले असतात. या पेडंटंसना डायमंड टच असतो ज्यामुळे त्यांना सोन्याच्या दागिन्यांसारखी चमक मिळते. (10 Designs Of Victoria Mangalsutra)
3 / 10
यामध्ये सामान्यत: गोल्ड प्लेटिंग, रोज गोल्ड किंवा ऑक्सिडाईज्ड फिनिश वापरली जाते. जी व्हिंटेज लूकला पुरक ठरते.
4 / 10
ही मंगळसूत्र आकारानं थोडी मोठी असल्यानं पारंपरिक वेशभूषा तसंच अधुनिक स्टाईलच्या साड्यांवरही हे मंगळसूत्र उठून दिसतात.
5 / 10
साध्या लहान पेंडंटपासून ते पूर्णपणे जडवलेल्या गळाभर डिझाईन्सपर्यंत अनेक पॅठर्न्स या मंगळसूत्रात उपलब्ध आहेत.
6 / 10
बहुतांश व्हिक्टोरिया मंगळसूत्र हे इमिटेशन ज्वेलरी किंवा चांदीमध्ये बनवलेले असल्यामुळे सोन्याच्या तुलनेत त्यांची किंमत खूपच कमी असते.
7 / 10
अनेकदा हे मंगळसूत्र जुळणाऱ्या कानातल्यांच्या जोडीसोबत उपलब्ध असतात.ज्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतात.
8 / 10
सध्या तरूण पिढीमध्ये शॉर्ट आणि मिडियम लांबीच्या व्हिक्टोरिया मंगळसुत्रांना विशेष मागणी आहे.
9 / 10
सोशल मीडियावर आणि सेलिब्रिटींमध्ये या प्रकारच्या दागिन्यांचा वापर वाढल्यामुळे त्यांचा ट्रेंड अधिक लोकप्रिय झाला आहे.
10 / 10
नेहमी तेच तेच सोन्याचं मंगळसूत्र घालण्यापेक्षा तुम्ही फॅन्सी साड्यांवर हे नवीन मंगळसूत्र ट्राय करू शकता.
टॅग्स : खरेदीफॅशनशुभविवाहदागिने