Join us

चुडी खनकेगी! लग्नात घालण्यासाठी बांगड्यांचे लेटेस्ट पॅटर्न, बांगड्या इतक्या सुंदर की हात देखणेच दिसतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 19:27 IST

1 / 8
लग्नसराई किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की तो बांगड्यांशिवाय अपूर्णच आहे. पुर्वी फक्त काचेच्या बांगड्या हा एक पर्याय असायचा. पण आता मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय आकर्षक बांगड्या पाहायला मिळतात. बघा त्याचीच एक झलक..
2 / 8
सिल्कचा धागा वापरून थ्रेड वर्क केलेल्या बांगड्या आणि त्यावर जडवलेले कुंदन तुमच्या हाताला नक्कीच शोभा आणतील..
3 / 8
अशा पद्धतीचे थ्रेड वर्क गोठ देखील हल्ली खूप जणी घालतात. एकच गोठ घातला तरी तो हातात उठून दिसतो.
4 / 8
वेल्वेटच्या बांगड्यांची सध्या खूप क्रेझ आहे. कितीतरी रंगात या बांगड्या मिळत असल्याने तुम्ही तुमच्या कपड्यांवर मॅचिंग असणारे शेड निवडू शकता. त्याच्या अवतीभोवती मोत्याच्या किंवा गोल्डन रंगाच्या बांगड्या घातल्या की त्या आणखी खुलतात.
5 / 8
काही साड्या किंवा ड्रेस असे असतात की ज्यावर ऑक्सिडाईज बांगड्याच जास्त शोभून दिसतात. ऑक्सिडाईज प्रकारातल्याही कित्येक बांगड्या तुम्हाला ऑनलाईन शाॅपिंग साईटवर तसेच तुमच्या शहरातल्या बाजारात मिळतील.
6 / 8
अशा पद्धतीच्या डिझायनर बांगड्याही तुम्ही घालू शकता. सिल्कच्या साडीवर किंवा लेहेंग्यावर असा एकच हेवी वर्क असणारा गोठ घातला तरी छान दिसतो.
7 / 8
डिझायनर बांगड्यांमधला हा आणखी एक प्रकार पाहा..
8 / 8
मिररवर्क प्रकारातही सध्या बांगड्यांचे अनेक नवनविन प्रकार पाहायला मिळतात. लेहेंगा, घागरा अशा कपड्यांवर त्या जास्त छान दिसतात.
टॅग्स : शुभविवाहदागिनेलग्नस्टायलिंग टिप्सफॅशन