Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्नसोहळ्यात साडीवर शोभून दिसतात टेम्पल इअररिंग्ज, ८ सुंदर डिझाइन्स-मॉडर्न आणि ट्रॅडिशनल लूकची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:50 IST

1 / 8
टेम्पल इअररिंग्स सध्या फॅशन विश्वात प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत. कोणत्याही साडीवर सूट होतील असे टेम्पल इअररिंग्स तुम्ही यंदाच्या लग्नसराईत घेऊ शकता. (8 Temple Earrings Designs For Wedding Season)
2 / 8
टेम्पल ज्वेलरीची मुळं दक्षिण भारतातील मंदिरांच्या कोरिव कामात आहेत. यात प्रामुख्यानं देवी-देवता, कमळ, मोर आणि हत्ती यांच्या आकृत्या पाहायला मिळतात. (Trending Temple Earrings)
3 / 8
हे इअररिंग्स आकाराचे थोडे मोठे आणि वजनाला भरीव असतात ज्यामुळे चेहऱ्याला एक वेगळाच ग्लो आणि रॉयल लूक मिळतो.
4 / 8
काठ पदराच्या साड्या, पैठणी किंवा सिल्क साड्यांवर टेम्पल इअररिंग्स अत्यंत सुंदर दिसतात. ते साडीच्या पारंपारीक सौंदर्याला अधिकच खुलवतात.
5 / 8
यामध्ये झुमके, चांदबाली, सुई-दोरा पद्धतीचे लांब कानातले उपलब्ध आहेत. त्यावर केलेले बारीक नक्षीकाम सर्वांचेच लक्ष वेधून घेते.
6 / 8
हे कानातले सहजा मॅट गोल्ड फिनिशमध्ये असतात. जे खऱ्या सोन्यासारखे दिसतात आणि अधिक भडक न वाटता मोहक वाटतात.
7 / 8
लग्नसराई, पूजा किंवा कोणत्याही पारंपारीक कार्यक्रमांसाठी हे इअररिंग्स एक परिपूर्ण एक्सेसरी ठरतात.
8 / 8
यात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे इअररिंग्स निवडता येतील. ज्यामध्ये तुमचा लूक खुलून येईल.
टॅग्स : खरेदीफॅशनदागिने