Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लाल लाल कलरची बांगडी...! लाल बांगड्याच्या १० सुंदर डिझाईन्स, हातात शोभून दिसतील बांगड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 16:14 IST

1 / 10
लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल (Laal Bandagi Song) या गाण्यानं सोशल मीडियावर खरोखरच धुमाकूळ घातला आहे. लाल रंग हा शुभशकूनाचा आणि सौंदर्याचा प्रतीक मानला जातो. (10 Red Bangle Design)
2 / 10
त्यामुळे या गाण्यावरील रिल्ससाठी महिलांमध्ये लाल बांगड्यांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. (Trending Latest Red Bangle)
3 / 10
साध्या लाल बांगड्यांचे हे डिझाईन्स सदाबहार आहेत. गाण्यातील अस्सल मराठमोळा लूक मिळवण्यासाठी अनेकजणी साध्या काचेच्या लाल बांगड्यांना पसंती देत आहेत.
4 / 10
सध्या ग्लॉसीऐवजी मॅट लाल रंगाच्या बांगड्यांची फॅशन आहे. ज्या दिसायला अत्यंत रॉयल आणि अधुनिक वाटतात.
5 / 10
लग्नसराई किंवा सणासुदीच्या रिल्ससाठी लाल रंगाच्या बांगड्यांवर सोनेरी जरी काम किंवा कुंदन लावलेले डिझाईन्स खूपच उठून दिसतात.
6 / 10
लाल रंगाच्या वेलवेटच्या बांगड्यांनाही एक वेगळीच चमक असते. या बांगड्या हाताला टोचत नाही आणि दिसायलाही सुंदर दिसतात.
7 / 10
लाल बांगड्यांवर पांढरे किंवा लाल खडे लावलेले डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. जे प्रकाशात छान चमकतात.
8 / 10
जयपुरी स्टाईल लाल लाखीच्या बांगड्यांवर बारीक काचकाम किंवा डिझाईन्स असल्यास त्या पारंपारीक कपड्यांवर खूपच सुंदर दिसतात.
9 / 10
काहीजणी चालताना आवाज येणाऱ्या घुंगरू लावलेल्या लाल बांगड्यांना पसंती देत आहेत. ज्यामुळे गाण्याच्या बोलांचा एक वेगळाच फिल येतो.
10 / 10
वजनाला हलक्या आणि रोजच्या वापरासाठी सोयीस्कर अशा लाल रंगाच्या मेटल बांगडयांवर नाजूक कोरीव काम केलेले पाहायला मिळते.
टॅग्स : खरेदीदागिने