By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:11 IST
1 / 8हे सध्याचे ट्रेंडींग ब्लाऊज डिझाईन्स आहेत. या डिझाईन्सचे वैशिष्ट म्हणजे हे पारंपारीक साड्यांनाही अधुनिक लूक देतात. (10 Unique Blouse Designs Of Back Neck)2 / 8यामध्ये पाठीचा भाग पूर्णपणे बंद न ठेवता मध्यभागी विशिष्ट आकाराचे कापड काढले जाते. डायमंड, सर्कल आणि हॉर्ट शेपचे सुंदर कट-आऊट्समुळे ब्लाऊजला एक डिझाईनर टच मिळतो. 3 / 8पाठीमागचा गळा बंद ठेवून तुम्ही त्यावर मिरर वर्कसुद्धा करून घेऊ शकता.4 / 8काही डिझाईन्स पाठीच्या मधोमध रांगेत बटन्स लावले आहेत. हे कापडाचेच बनवलेले पोटली बटन्स असून ते सध्या फॅशनमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यामुळे ब्लाऊजला एक क्लासी लूक मिळतो.5 / 8ब्लाऊजचा मूळ रंग आणि गळ्याच्या बॉर्डरचा डिझाईन्सचा रंग वेगवेगळा ठेवल्यास लूक अधिकच उठून दिसतो.6 / 8 या सर्व डिझाईन्समध्ये तुम्ही स्लिव्हजलेस पॅटर्न्स शिवून मागे असे कापडाचे बटन्स लावू शकता.7 / 8अशा डिझाईन्ससाठी सिल्क कॉटन किंवा थोडं कडक कापड चांगले वाटते कारण त्यामुळे आकार स्पष्ट दिसतो.8 / 8पाठीचा गळा मोठा किंवा डिझायनर असेल तर खांदे उतरू नयेत म्हणून डोरी लावणं फायदेशीर ठरते.