By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:35 IST
1 / 11ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या डिझाईन्समध्ये सध्या बॅकलेस आणि कटआऊट पॅटर्न बरेच चर्चेत आहेत. (Trending Back Neck Blouse Designs of 2026)2 / 11पारंपारीक लूकसाठी मटका गळा किंवा पान गळा यावर जड एम्ब्रॉयडरी किंवा मण्यांचे काम करून त्याला नवी साज दिला जात आहे. (Top 10 Unique Back Neck Blouse Designs)3 / 11अधुनिक फॅशनमध्ये व्ही कट आणि चोकौनी गळ्याला गोंडे किंवा लेस लावून अधिक आकर्षक बनवले जात आहे.4 / 11सध्या इल्यूजन बॅक डिझाईनचा मोठा ट्रेंड आहे. ज्यामध्ये स्किन कलरच्या नेटवर एम्ब्रॉयडरी केली जाते जणू काही ती नक्षी थेट पाठीवरच कोरली आहे.5 / 11विंडो पॅटर्नमध्ये पाठीवर खिडकीसारखे दोन-तीन छोटे कप्पे करून त्यात पारदर्शक कापड किंवा मणी लावले जातात जे अत्यंत मॉडर्न दिसतात. 6 / 11मल्टीपल दोरी ब्लाऊजमध्ये पाठीवर एकाऐवजी ४ ते ५ आडव्या दोऱ्या आणि त्यांना साजेसे छोटे मणी लावून एक नेट तयार केली जाते. 7 / 11गळ्याच्या कडांना साध्या गोलाऐवजी कमळाच्या पाकळ्यांसारखा आकारही दिला जातो तर बो डिझाईन्सचे ब्लाऊज अधिक सुंदर दिसतात.8 / 11गळ्याच्या कडेनं पूर्णपणे कापडी पोटली बटन्सची लाईन जी सिल्क साडयांवर रॉयल दिसते.9 / 11खालच्या बाजूनं वर जाणारा टोकदार कटवर्क, जो कंबरेला स्लिम लूक देतो आणि ब्लाऊज सुंदर दिसते.10 / 11 पाठीच्या मध्यभागी उभी पट्टी ट्रांन्सपरंट ठेवून बाजूला जड वर्क केलेले ब्लाऊज डिझाईन्स सध्या ट्रेंडींग आहेत.11 / 11हातांना नेट लावून तुम्ही तसंच पाठी मागच्या भागाला नेट लावून तुम्ही ब्लाऊजचा लूक अधिक युनिक बनवू शकता.