Join us   

लग्नसराईसाठी मराठमोळ्या थाटाचे ऑक्सिडाईज दागिने घ्यायचे? मग 'हे' दागिने तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2024 2:14 PM

1 / 9
ऑक्सिडाईज दागिन्यांची सध्या खूप क्रेझ आहे. हल्ली तर अनेक पारंपरिक साड्यांनाही सिल्व्हर किंवा चंदेरी रंगातले काठ येत आहेत. त्यामुळे त्या साडीवर मग अनेकजणी ऑक्सिडाईज दागिने घालतात.
2 / 9
लग्नसराईसाठी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने घेणार असाल तर हे काही मराठमोळे दागिने तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजेत.
3 / 9
यापैकी सगळ्यात पहिला दागिना म्हणजे नथ. पारंपरिक तसेच अधुनिक ऑक्सिडाईज नथीचे अनेक प्रकार बाजारात मिळतील.
4 / 9
महाराष्ट्राची ओळख सांगणारा दुसरा दागिना म्हणजे कुड्या. काही वर्षांपर्यंत फक्त मोत्याच्याच कुड्या मिळायच्या. पण आता मात्र ऑक्सिडाईज कुड्याही मिळतात.
5 / 9
ऑक्सिडाईज ठुशीचे कित्येक प्रकार तुमच्या शहरातल्या बाजारपेठेत किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतील.
6 / 9
असा ठसठशीत कोल्हापुरी साज लग्नकार्यात शोभून दिसतो. तो एकच दागिना घातला तरी पुरेसा आहे.
7 / 9
प्राजक्ता माळीच्या गळ्यात जो लांब दागिना आहे त्याला एकदाणी असे म्हणतात. तो ही पारंपरिक मराठी दागिना म्हणून ओळखला जातो.
8 / 9
गळ्यातला जो हा दागिना आहे त्याला बोरमाळ म्हणतात. लग्नसराईसाठी साडीवर असे पारंपारिक दागिने खूप खुलून दिसतात.
9 / 9
पारंपरिक लक्ष्मीहाराचा हा एक मॉडर्न प्रकार म्हणता येईल.
टॅग्स : खरेदीदागिनेलग्नप्राजक्ता माळी