Join us

गौरी गणपतीच्या सणाला हातात हवेतच सुंदर राजेशाही तोडे-मराठी परंपरेतल्या दागिन्याचे १० सुंदर डिझाइन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:58 IST

1 / 10
गौरी-गणपतीचा (Ganpati 2025) सण म्हटलं की दागिने हे आलेच. नऊवारी साडी किंवा साहावारी साडीवर पारंपारीक दागिने महिला घालतात. हातात नेहमीसारख्या बांगड्या घालण्यापेक्षा तुम्ही राजेशाही तोडे घालू शकता. हे तोडे तुमचा लूक अधिकच खुलवतील.(Maharashtrian Bangles Tode Designs)
2 / 10
तोड्यांना पारंपारीक महत्व आहे. पुरातन काळापासून वेगवेगळ्या प्रकारचे तोडे महिला वापरत आल्या आहेत. राजेशाही घराण्यांमध्येही तोडे घातले जायचे.(Tode Bangles Design)
3 / 10
लग्न-समारंभ किंवा गणपतीच्या सणासाठी तोडे घालणं उत्तम आहे. (Tode Bangles Designs)
4 / 10
तोड्यांची किंमत वजनावर आणि नक्षीकामांवर अवलंबून असते.
5 / 10
तोड्यांची रचना ही सोन्याच्या मण्यांनी केलेली असते. त्यात लाल, गुलाबी रंगाचे स्टोन्ससुद्धा असतात.
6 / 10
गुलाब तोडे, जाळीदार तोडे, पट्टेदार तोडे, रत्नजडीत तोडे, मोत्याचे तोडे असे अनेक प्रकार तोड्यांमध्ये उपलब्ध आहेत.
7 / 10
तोड्यांवर कमळ किंवा फुलांचे नक्षीकाम केले जाते. काहीवेळा प्राण्यांचेही नक्षीकाम तोड्यांवर असते.
8 / 10
आजूबाजूला हिरव्या बांगड्या घालून तुम्ही तोडे वापरू शकता.
9 / 10
जर तुम्ही मोत्यांची ज्वेलरी घालणार असाल तर त्यावर सूट होईल असे मोत्याचे तोडे घाला.
10 / 10
मोत्यांमध्ये तुम्ही लाल किंवा गुलाबी स्टोन्स आपल्या आवडीनुसार निवडू शकता.
टॅग्स : खरेदीफॅशनगणपती उत्सव २०२५गणपती 2025