Join us   

Tips To Buy Umbrella : बाजारातून चांगली छत्री विकत घेण्यासाठी 'या' ट्रिक्स वापरा; एकाच छत्रीवर निघेल पूर्ण पावसाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 5:54 PM

1 / 13
पावसाळा (Monsoon) सुरू व्हायला अगदी बोटांवर मोजण्याइतकेच दिवस उरले आहेत. पावसाळा म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती म्हणजे छत्री. छत्रीशिवाय घराबाहेर पडलं की नेमका त्याच दिवशी जोरदार पाऊस पडतो असा अनुभव सगळ्यांनाच येतो. काहीवेळा छत्री असूनही तुम्ही पूर्णपणे भिजता. त्या छत्रीचा काहीच उपयोग होत नाही. म्हणूनच या लेखात तुम्हाला छत्री विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सांगणार आहोत. (What Should I Consider When Buying an Umbrella) जेणेकरून पूर्ण पावसाळा ती छत्री खराब होणार नाही आणि व्यवस्थित वापरता येईल.
2 / 13
तुम्ही जी छत्री खरेदी कराल ती 10 किंवा 11 इंच लांबीची असेल हे पाहा, जेणेकरून तुम्हाला छत्री धरायला सोपं पडेल.
3 / 13
छत्रीचा आकार मोठा चांगला असावा जेणेकरून शरीराला संपूर्ण संरक्षण मिळेल.
4 / 13
छत्रीचे हँडल आरामदायक असावे आणि इतके गुळगुळीत नसावे की जास्त वेळ धरल्यास ते हातातून सटकेल.
5 / 13
काही लोकांना वाटते की छत्री महाग असेल तर ती चांगली असते. छत्री किमतीसह क्वालिटी बघायला विसरू नका.
6 / 13
छत्रीच्या दांड्याला गंज लागला असेल तर ती छत्री विकत घेऊ नका. अन्यथा काही दिवसांनी छत्री उघडायला आणि बंद करायला त्रास होऊ शकतो.
7 / 13
तुम्हाला छत्री पकडायला अडचण वाटत असेल तर तुमच्या बॅगेत व्यवस्थित मावेल अशी फोल्डेबल छत्री विकत घ्या. छत्रीचे बटन्स लूज नाहीयेत याची खात्री करूनच छत्री विकत घ्या.
8 / 13
तुम्हाला कलरफूल छत्र्या आवडत नसतील तर प्लेन छत्री घ्या. ३०० ते ६०० रूपयांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या छत्र्या उपलब्ध होतील.
9 / 13
दुकानातून छत्री घेण्याआधी उघडून पाहा. छत्रीचं कापड व्यवस्थित असल्याची खात्री करून मगच छत्री घ्या
10 / 13
आजकाल हार्टशेपच्या छत्र्याही बाजारात यायला सुरूवात झाली आहे.
11 / 13
ट्रांस्परंट छत्र्या ४०० ते ८०० रूपयांपर्यंत तुम्हाला बाजारात उपलब्ध होतील.
12 / 13
लहान मुलांसाठी छत्री विकत घेत असाल तर त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराच्या छत्र्या तुम्हाला पाहायला मिळतील.
13 / 13
(Image Credit- Social Media)
टॅग्स : खरेदीमानसून स्पेशलपाऊस