By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:39 IST
1 / 12उन्हाळ्याच्या दिवसांत स्टायलिश आणि आरामदायी दिसण्यासाठी खादी कॉटन साडी आणि रेडीमेड एम्ब्रॉयडरी ब्लाऊज हा सध्याच्या सर्वात लोकप्रिय ट्रेंड आहे. (Khadi Cotton Saree With Embroidery Blouse)2 / 12 खादीचे कापड हातानं विणलेले असल्यामुळे त्यात नैसर्गिक छिद्र असतात. ज्यामुळे हवा खेळती राहते आणि घामाचा त्रास कमी होतो. (Summer Special Khadi Cotton Saree And Readymade Blouse)3 / 12खादी कॉटनमध्ये आता पेस्टल कलर्स उदा. पुदिना, हिरवा, पीच, बेबी पिंक उपलब्ध आहेत. जे उन्हाळ्यात डोळ्याना सुखद वाटते.4 / 12साध्या खादी साडीवर जर बारीक एम्ब्रॉयडर भरतकाम केलेले रेडीमेड ब्लाऊज घातला तर साध्या लूकला लगचेच एक रॉयल टच मिळतो.5 / 12 मिरर वर्क, थ्रेड वर्क किंवा लखनवी चिकनकारी एम्ब्रॉयडरी असलेले ब्लाऊज खादी साडीवर अतिशय उठून दिसतात.6 / 12उन्हाळ्यात ऐनवेळी टेलरकडे ब्लाऊज शिवण्यासाठी टाकण्याची कसरत करावी लागत नाही. रेडीमेड ब्लाऊजमुळे फिटींगचा प्रश्नही सुटतो.7 / 12या साड्या वजनाला हलक्या असल्यामुळे दिवसभर ऑफिसमध्ये किंवा कार्यक्रमात वावरताना थकवा जाणवत नाही.8 / 12 खादी कॉटन जितके जास्त धुवावे तितके ते अधिक मऊ होत जाते. ज्यामुळे उन्हाळ्यातील प्रवासासाठी हा उत्तम ट्रॅव्हल फ्रेंडली पर्याय ठरतो.9 / 12 कॉन्टास्ट रंगाचा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज आणि खादीची साडी हा पेहराव पारंपारीक असूनही अधुनिक दिसतो. ज्यामुळे तुम्ही गर्दीत वेगळे दिसता.10 / 12या साड्यांमदध्ये तुम्हाला एलिगंट लूक मिळतो. २००० रूपयांपासून ते ३०० रूपयांपर्यंत तुम्हाा या साड्या सेट्ससकट मिळतील.11 / 12यात तुम्हाला डार्क रंग, सौम्य रंग अशा वेगवेगळ्या शेड्स मिळतील तसंच तुम्हाला कोणताही ड्रेस उठून दिसेल.12 / 12या साड्या ऑफिसवेअरसाठी किंवा घरात घालण्यासाठीही उत्तम पर्याय आहेत.