By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:20 IST
1 / 10उन्हाळ्यात आरामदायी आणि स्टायलिश राहण्यासाठी कॉटन कुर्ता, दुपट्ट सेट्स हे सर्वोत्तम पर्याय आहेत. (10 Cotton Kurta Sets For Summer Daily Use)2 / 10कॉटन ड्रेसमध्ये हवा खेळती राहते. ज्यामुळे घाम कमी येतो आणि त्वचेला त्रासही होत नाही. उन्हाळ्यासाठी खास कॉटन सेट्स पाहूया. (Summer Special Cotton Kurta Sets)3 / 10प्युअर कॉटन हे अत्यंत मऊ आणि घाम शोषून घेणारे असते. रोजच्या वापरासाठीही उत्तम ठरते.4 / 10मलमल कॉटन हे कापड वजनाला खूपच हलके असते. उन्हाळ्यातील लग्नसराई किंवा कार्यक्रमांसाठी याचे दुपट्टे अतिशय सुंदर दिसतात.5 / 10 खादी कॉटन हे थोडं जाड असलं तरी उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर थंड ठेवण्यास मदत होते.6 / 10जयपुरी किंवा सांगानेरी ब्लॉक प्रिंटस उन्हाळ्यात खूपच फ्रेश दिसातत. यात फुलांच्या किंवा पानांच्या डिझाईन्स असतात.7 / 10लखनवी चिकनकारी वर्क असलेले सुती कुर्ते उन्हाळ्यासाठी एव्हरग्रीन आहेत. पांढऱ्या किंवा पेस्टल रंगातील चिकनकारी अतिशय सुंदर दिसतात.8 / 10 तुम्हारा जर थोडा इंडो वेस्टर्न लूक हवा असेल तर इकत किंवा अजरख प्रिंट्सचे सेट्स ट्राय करा.9 / 10उन्हापासून बचावासाठी कॉटनचा दुपट्टा वापरा. तो तुम्ही गळ्यात स्टायलिश पद्धतीनं घेऊ शकता किंवा डोक्यावरूनही घेऊ शकता.10 / 10या सेट्सवर ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी किंवा कोल्हापूरी चपला खूपच छान दिसतात.