By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:08 IST
1 / 10उन्हाळ्याच्या दिवसांत सुती कपडे वापरणं हाच सर्वोत्तम पर्याय असतो. उन्हाळ्यासाठी खास कॉटन ड्रेस पीसची काही वैशिष्ट खालीप्रमाणे आहेत. (Summer Special Cotton Kurta Sets)2 / 10 सुती कापड घाम लवकर शोषून घेते. ज्यामुळे शरीर कोरडे आणि थंड राहण्यास मदत होते. (Summer Special Cotton Kurt Sets)3 / 10कॉटनचे कापड हलके आणि ब्रिदेबल असते. ज्यामुळे त्वचेवर हवा खेळती राहते आणि उकडा कमी जाणवतो. त्यामुळे हे कुर्ता सेट्स तुम्ही आरामात २-३ महिने वापरू शकता.4 / 10 हे कापड नैसर्गिक धाग्यांपासून तयार केलेले असल्यामुळे संवेदनशील त्वचेसाठी अत्यंत सुखद असते आणि रॅशेस किंवा खाजेचा त्रास होत नाही.5 / 10 उन्हाळ्यासाठी सुती ड्रेस पीसमध्ये खादी कॉटन, मलमल कॉटन आणि कोटा डोरीया असे हलके आणि मुलायम प्रकार उपलब्ध असतात.6 / 10सध्या यात ब्लॉक प्रिंट कलमकारी आणि साधे एम्ब्रॉयडरी केलेले पॅटर्न, मिरर वर्क खूपच फॅशनेबल वाटतात.7 / 10 कॉटनचे कपडे धुण्यासाठी सोपे असतात आणि ते कडक उन्हात लवकर सुकतात. दिवसभर बाहेर काम करणाऱ्या महिलांसाठी किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्यांसाठी कॉनटचे ड्रेस पीस अतिशय आरामदायी आणि क्लासी लूक देतात.8 / 10 उन्हाळ्यातील घामाचा आणि उष्णतेचा त्रास कमी करून तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवण्यासाठी कॉटनचे ड्रेस पीस हा उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.9 / 10यामध्ये तुम्हाला गडद, सौम्य असे बरेच रंगांचे पर्याय उपलब्ध होतील. यात स्मॉल पासून ते ट्रिपल एक्स एलपर्यंत सर्व साईज तुम्हाला उपलब्ध होतील.10 / 10ड्रेसपीस खरेदी करताना शुद्ध कॉटनचे असतील याची खात्री करून घ्या. जर तुम्ही ऑनलाईन कपडे खरेदी करत असाल तर रिटर्न पॉलिसी पाहून मगच ड्रेसेस घ्या.