Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सुईधागा कानातल्यांचा नवा ट्रेंड-पाहा १० सुंदर डिझाइन्स; साडी आणि ड्रेसवरही शोभून दिसणारे नाजूक कानातले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:46 IST

1 / 10
रोजच्या वापरासाठी सुई-धागा कानातले हा एक अत्यंत लोकप्रिय आणि फॅशनेबल पर्याय आहे. (Sui Dhaga Earrings For Daily Use)
2 / 10
हे कानातले एका लांब, बारीक साखळीच्या किंवा धाग्याच्या स्वरूपात असतात. ज्याच्या एका टोकाला सुईसारखा टोकदार भाग असतो. (Sui Dhaga Earrings in Gold Light Weight Sui Dhaga Earrings)
3 / 10
यातील सुईसारखा भाग कानाच्या छिद्रातून सहजपणे आरपार ओवला जातो. ज्यामुळे कानातले व्यवस्थित लटकतात.
4 / 10
हे कानातले आपण आपल्या आवडीनुसार लहान किंवा मोठे ठेवू शकता ज्यामुळे ते घालताना एक वेगळाच लूक मिळतो.
5 / 10
हे कानातले वजनाला अत्यंत हलके असतात. त्यामुळे दिवसभर कानात घातले तरी कानांना त्रास होत नाही किंवा जड वाटत नाही.
6 / 10
सुई-धागा कानातले दिसायला अतिशय नाजूक आणि स्टायलिश असतात. जे ऑफिस, कॉलेज किंवा रोजच्या वापरासाठी उत्तम ठरतात.
7 / 10
बाजारात हे सोन्याचे, चांदीचे किंवा ऑक्सिडाईज्ड धातूंमध्ये विविध पॅटर्नमध्ये उपलब्ध असतात.
8 / 10
हे कानातले साडी, कुर्ती किंवा वेस्टर्न कपड्यांवरही खूपच छान उठून दिसतात. ज्यामुळे एक अधुनिक आणि मिनिमलिस्ट लूक मिळतो.
9 / 10
हे कानातले वापरल्यानंतर मऊ कापडानं पुसून ठेवल्यास त्याची चमक बराचवेळ टिकून राहते.
10 / 10
हे कानातले काढताना किंवा घालताना घाई करू नये. कारण साखळी नाजूक असल्यामुळे ती ओढली जाण्याची शक्यता असते.
टॅग्स : खरेदीफॅशनदागिने