Join us

सुई धागा डिजाईनचे नाजूक, सुंदर कानातले; डेली वेअरसाठी कमी वजनाचे १० युनिक पॅटर्न्स, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:28 IST

1 / 10
सुई धागा कानातले (Sui Dhaga Earrings) हा कानातल्यांचा लोकप्रिय प्रकार असून महिलांची पसंती या कानातल्यांना असतेच. त्याच्या डिजाईन पॅटर्नवरून सुई-धागा हे नाव पडले आहे.(Daily Wear Light Weight 10 Unique designs)
2 / 10
या कानातल्यांमध्ये साधे चेन असलेले, रत्नजडीत, ऑक्सिडाईज्ड, झुमका सुई धागा असे बरेच पॅटर्न्स आहेत.
3 / 10
हे कानातले घालायलाही सोपे असतात. आधी साळखीचे टोक कानाच्या छिद्रातून हळूवार आत घालायचे. त्यानंतर साखळी ओढायची जोपर्यंत डिजाईनचा भाग कानाच्या समोर येत नाही तोपर्यंत नंतर उरलेली कानाच्या मागे लटकत ठेवायची.
4 / 10
हे कानातले वजनाला हलके असतात. तसंच आरामदायक फिल देतात.
5 / 10
तु्म्ही हे कानातले रोजच्या वापरासाठी तसंच विशेष कार्यक्रमांसाठी घालू शकता.
6 / 10
हे कानातले साडीवर किंवा पारंपारीक इंडियन ड्रेसवर जास्त शोभून दिसतात.
7 / 10
या कानातल्यांना पिन किंवा स्क्रू नसल्यामुळे घालायला सोपे असतात.
8 / 10
हे कानातले कमी वजनाचे असल्यामुळे तुम्ही २ ते २.५ ग्रॅममध्येही बनवून घेऊ शकता.
9 / 10
तुम्ही १ ग्रॅम सोन्यातही असे कानातले रोजच्या वापरासाठी किंवा कोणालाही गिफ्ट देण्यासाठी बनवू शकता.
10 / 10
यात तुम्हाला साध्या डिजाईनपासून भरगच्च भरलेल्या डिजाईन्सपर्यंत अनेक पर्याय मिळतील.
टॅग्स : खरेदीफॅशन