By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:05 IST
1 / 102026 मध्ये ब्लाऊजच्या बऱ्याचश्या ट्रेंडींग डिझाईन्स व्हायरल होताना दिसून येत आहेत. त्यातले काही सिलेक्टीव्ह, युनिक डिझाईन्स पाहूया. (Stylish Blouse Designs of 2026)2 / 10 साध्या कोपरापर्यंत लांबी असलेल्या फुग्याच्या बाह्या प्रचंड फॅशनमध्ये आहेत. कोपरापर्यंत बाह्या ठेवून त्यावर काठांना नाजूक कटवर्क करणं लोकप्रिय आहेत. (Latest Blouse Sleeves Designs)3 / 10 बाह्यांच्या मधोमध किंवा काठावर साडीच्या रंगाची लहान पोटली बटन्स लावून त्याला रॉयल लूक दिला जातो.4 / 10 बाह्यांसाठी पारदर्शक नेट वापरून त्यावर वेलबुटी किंवा मण्याचे काम सध्या ट्रेंडींग आहे.5 / 10बाह्यांच्या टोकाला गोलाकार किंवा त्रिकोणी पद्धतीचे कट दिले जातात. अशी फॅशन सध्या व्हायरल होत आहे.6 / 10खांद्यापासून मनगटापर्यंत सैल आणि मनगटावर घट्ट बॉर्डर असलेल्या बाह्या खूपच क्लासी दिसतात.7 / 10 बाह्यांच्या कडेला रेशमी धाग्यांचे लटकन किंवा मणी लावून त्याला ट्रेंडी बनवले जाते.8 / 10खांद्याजवळ कट देऊन तिथे साडीच्या काठाचा वापर करणं अजूनही पसंतीस उतरत आहे.9 / 10 हाताच्या पंजाकडे रुंद होत जाणाऱ्या बाह्या इंडो वेस्टर्न साड्यांवर उठून दिसतात.10 / 10जर तुम्ही बोट नेकचं ब्लाऊज शिवत असाल तर अशा पॅटर्नचे हात शिवू शकता.