Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रोज वापरण्यासाठी घ्या चांदीचे कडे; १० सुंदर डिजाईन्स, ऑफिसला-घरात कुठेही घाला, एलिगंट लूक मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 13:00 IST

1 / 10
रोजच्या वापरासाठी चांदीचे कडे घालणं हा सध्या नवीन ट्रेंड आहे. कारण ते सोपे, आकर्षक आणि सर्व प्रकारच्या ड्रेसेसवर शोभून दिसतात. ( Delicate Silver Bracelet For Women)
2 / 10
नवीन पॅटर्न्समध्ये सिलव्हर ब्रेसले्ट्स खूपच लोकप्रिय आहेत जे नाजूक आणि अधुनिक दिसतात. (Special Silver Bracelet For Women)
3 / 10
काही डिझाईन्समध्ये बारीक नक्षीकाम केलेले असते. ज्यामुळे त्यांना पारंपारीक आणि अधुनिकतेचा स्पर्श मिळतो.
4 / 10
प्लेन किंवा कमी नक्षी असलेले कडे ऑफिसच्या किंवा रोजच्या कामासाठी उत्तम आहेत. कारण ते सहजपणे घातले जातात आणि काढलेही जाऊ शकतात.
5 / 10
तुम्ही चांदीच्या घड्याळांसोबत मॅचिंग कडे घालू शकता. ज्यामुळे तुमचा लूक अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसेल.
6 / 10
जिन्स, ड्रेस किंवा साडी अशा कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर हे नवीन पॅटर्न्स सहज शोभून दिसतात.
7 / 10
सध्या बाजारात एडजस्टेबल आणि ओपन एन्डेड कडे देखिल उपलब्ध आहेत जे आकारानुसार कमी जास्त करता येतात.
8 / 10
काही डिझाईन्समध्ये छोटे रंगेबिरंगी स्टोन किंवा मोती जोडलेले असतात ज्यामुळे त्यांना एक खास सौंदर्य प्राप्त होते.
9 / 10
काही कड्यांमध्ये गोल्डन रंगाचा वापरही केला जातो. तसंच बारीक स्टोनचे वर्क असते.
10 / 10
असे नाजूक कडे गिफ्ट देण्यासाठीसुद्धा उत्तम आहेत दीड हजार रूपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत तुम्हाला सुंदर सुंदर चांदीचे कडे घेता येतील.
टॅग्स : खरेदीफॅशन