Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्नसराईत घालता येतील अशा छोट्या मंगळसुत्रांच्या १० सुंदर डिझाईन्स-रोज वापरायलाही छान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:35 IST

1 / 10
लग्नसराईच्या गडबडीत सध्या डेली वेअर आणि लाईटवेट दागिन्यांना मोठी पसंती मिळत आहे. लग्नसराईसाठी सोन्याच्या छोट्या मंगळसुत्रांच्या काही खास डिझाईन्स पाहूया. (Gold Mangalsutra designs)
2 / 10
सध्या केवळ एक किंवा दोन काळे मणी आणि मध्यभागी सोन्याचे छोटे नाजूक पेंडंट असलेल्या डिझाईन्स बऱ्याच व्हायरल होत आहेत.
3 / 10
अशी मंगळसूत्र पारंपारीक तसंच रोज वापरण्याच्या कॅज्युअल कपड्यांवरही उठून दिसतात.
4 / 10
छोट्या आकारातही देवी-देवतांच्या प्रतिमा किंवा कमळाच्या फुलांचे कोरीव काम असलेली मॅट फिनिशिंगची मंगळसूत्र पारंपारीक लूक देतात.
5 / 10
सोन्याच्या पेंडंटमध्ये जरकन किंवा अमेरिकन डायमंडसचा वापर केल्यामुळे मंगळसुत्राला अधिक चमक आणि अधुनिक लूक येतो.
6 / 10
फुलांच्या पाकळ्या, पानांचे डिझाईन्स, हॉर्ट शेप असे पेडंटं तरूण पिढीच्या पसंतीस उतरत आहेत.
7 / 10
पारंपारीक दोन वाट्यांच्या मंगळसुत्राला आता अधुनिक टच देऊन त्यावर सुक्ष्म नक्षीकाम किंवा नाजूक घुंगरू लावले जातात.
8 / 10
लांब मंगळसुत्रांऐवजी गळ्याला चिकटून बसणारे शॉर्ट चेन आणि त्यामध्ये गुंफलेले छोटे काळे मणी खूपच ग्रेसफुल वाटतात.
9 / 10
ही छोटी मंगळसूत्र तुम्ही साधारणपणे ५ ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनात तयार करू शकता. ज्यामुळे ती दिसायला सुंदर आणि खिशाला परवडणारी असतात.
10 / 10
या मंगळसुत्रांमध्ये तुम्हाला बरेच वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील जे नेहमीच्या वापरासाठी उत्तम दिसतील.
टॅग्स : खरेदीफॅशन