Join us
Daily Top 2 Weekly Top 5

महागाईतही होईल मोठी बचत! गृहिणींसाठी घरखर्च कमी करण्याच्या १० 'स्मार्ट टिप्स' - कमी पैशांतही घर चालेल व्यवस्थित...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 09:56 IST

1 / 12
आजच्या वाढत्या महागाईच्या काळात घरखर्च सांभाळणे (smart ways to reduce household expenses) हे प्रत्येक कुटुंबासाठी मोठे कठीण काम आहे. महिन्याचे बजेट कितीही ठरवले तरी किराणा, वीजबिल, गॅस, मुलांचे खर्च आणि दैनंदिन गरजा यामुळे खर्च वाढतच जातो. अशा परिस्थितीत घर व्यवस्थित चालवण्याची सर्वात मोठी जबाबदारी गृहिणींवर येते. वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कितीही कमवले तरी महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा होतोच, अशी तक्रार अनेक घरांमध्ये ऐकायला मिळते. महागाईच्या या युगात घरखर्च चालवताना गृहिणींची मोठी ओढाताण होते. अनेकदा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतो आणि मग उधारी घेण्याची वेळ येते(household budget planning tips).
2 / 12
परंतु थोडं नियोजन, स्मार्ट सवयी आणि काही सोप्या उपायांचा (how to manage home expenses efficiently) वापर केल्यास कमी खर्चातही घर उत्तम प्रकारे चालवता येऊ शकते. पैशांची बचत करताना घरातील गरजांमध्ये (low budget home management ideas) कोणतीही कमतरता न ठेवता आर्थिक संतुलन राखणे शक्य आहे. योग्य आर्थिक नियोजन केल्यास दर महिन्याचा घर खर्च कमी होण्यासोबतच, तुमची बचतही वाढेल. खास गृहिणींसाठी कमी खर्चात घर चालवण्याच्या काही स्मार्ट टिप्स....
3 / 12
महिन्याच्या सुरुवातीलाच आवश्यक खर्चांची यादी तयार करा. किराणा, बिल्स, शिक्षण, प्रवास आणि बचत यासाठी वेगवेगळे बजेट ठेवल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो.
4 / 12
जेव्हा तुम्ही बाजारात जाता, तेव्हा आवश्यक वस्तूंची यादी सोबत ठेवा. यादीत नसलेल्या वस्तू खरेदी करणे टाळल्यास पैशांची मोठी बचत होते.
5 / 12
नवीन किराणा माल आणण्यापूर्वी स्वयंपाकघरात शिल्लक असलेल्या सामानाची यादी करा. नवीन सामान भरण्याआधी आधीच घरात असलेले धान्य किंवा डाळी संपवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अन्नाची नासाडी होणार नाही आणि पैशांची बचत होईल. तांदूळ, गहू, डाळी यांसारख्या रोज लागणाऱ्या वस्तू किरकोळ दुकानाऐवजी घाऊक बाजारातून किंवा सेलमध्ये खरेदी करा. यामुळे किमतीत बराच फरक पडतो.
6 / 12
विनाकारण सुरू असलेले दिवे किंवा पंखे बंद करण्याची सवय लावा. पाण्याचा अपव्यय टाळा, यामुळे महिन्याची बिले कमी येण्यास मदत होईल. उन्हाळ्यात एसी नेहमी २४°C ते २६°C वर सेट करा. यामुळे खोली लवकर थंड होण्यास मदत होते आणि विजेचे बिलही कमी येते.
7 / 12
हॉटेलिंग किंवा बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्यापेक्षा घरीच पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ बनवण्यावर भर द्या. यामुळे आरोग्य आणि पैसा दोन्ही जपले जातात.
8 / 12
रोजच्या खर्चातून उरलेले सुटे पैसे किंवा काही ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवा. ही छोटी बचत भविष्यातील गरजेच्या किंवा आपत्कालीन कामात मोठी मदत करते.
9 / 12
मोबाईल अ‍ॅप्स, OTT किंवा वापरात नसलेल्या सेवांवर होणारा खर्च तपासा आणि गरज नसलेले प्लॅन बंद करा.
10 / 12
एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी तपासा. कमी दरात चांगली वस्तू मिळू शकते.
11 / 12
एखादी वस्तू आवडली तरी ती खरोखर गरजेची आहे का याचा विचार करा; गरज नसल्यास खरेदीसाठी थोडा वेळ थांबल्याने अनावश्यक खर्च कमी होतो.
12 / 12
१०. थोडं नियोजन, संयम आणि स्मार्ट निर्णय घेतल्यास कमी उत्पन्नातही घर आनंदाने आणि व्यवस्थित चालवता येते.
टॅग्स : खरेदीसुंदर गृहनियोजनसोशल व्हायरल