Join us

दंड जाड असल्यामुळे स्लिव्ह‌जलेस ब्लाऊज घालणं टाळता? १० नवे पॅर्टन्स, दिसाल कमाल सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 14:21 IST

1 / 10
सण उत्सवांना किंवा खास प्रसंगाना महिला आवर्जून साड्या नेसतात. पण नवनवीन साड्यांवर त्याच जुन्या पॅटर्न्सचे ब्लाऊज शिवले तर लूक काहीसा बिघडतो. आपले हात जाड दिसतात, आर्म फॅट दिसतं म्हणून अनेकजणी स्लिव्हलेस घालणं टाळतात. (Which blouse sleeves are best for fat arms)
2 / 10
बॉलिवूड अभिनेत्रींच्या काही स्टायलिंग टिप्स फॉलो करून तुम्ही परफेक्ट लूक मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. फक्त काही नवीन ब्लाऊज पॅटर्न्स शिवावे लागतील.
3 / 10
शिफॉन किंवा ऑर्गेंजा साड्यांवर तुम्ही सिंगल स्ट्रीपचे ब्लाऊज ट्राय करू शकता यामुळे तुमच्या हातांची चरबी जास्त दिसून येणार नाही. ब्लाऊज पॅटर्नवर सर्वाचं लक्ष राहील. (Sleeveless blouse designs ideas)
4 / 10
व्ही नेक लाईन ब्लाऊजमुळे लोकांचं तुमच्या हातांकडे लक्ष जाणार नाही. यासाठी ब्लाऊजच्या नेकलाईनवर लक्ष देणं गरजेचं आहे. नेकलाईन बनवताना खोल व्ही नेक निवडा, यामुळे नेकबोन्सवर अधिक लक्ष जाते.
5 / 10
व्हेवी वर्क किंवा प्रिटेंट ब्लाऊज असेल तर तुमच्या हातांच्या चरबीवर जास्त लक्ष जात नाही. अधिकाधिक लक्ष ब्लाऊजचं पॅटर्न वेधून घेत असते.
6 / 10
स्लिव्हजलेस ब्लाऊजवर तुम्ही हेवी नेकलेस किंवा मोठे कानातले घालू शकता यामुळे जास्त काही दागिने न घालता परफेक्ट लूक मिळेल.
7 / 10
स्लिव्हजलेस बोट नेक पॅटर्न ऑफिसवेअरसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही कॉटनच्या किंवा ऑफिससाठी निवडलेल्या कोणत्याही साडीवर हा एलिगंट लूक करू शकता.
8 / 10
कॉटनच्या साड्यांवर प्रिटेंट स्लिव्हजलेस ब्लाऊज डिसेंट लूक देईल.
9 / 10
ब्लाऊजचा मागचा गळा तुमच्या आवडीनुसार ठेवा. पण तो जास्त डिप असेल तर बोल्ड आणि उठून दिसेल. म्हणून स्लिव्हजलेस ब्लाऊजवर असे पॅटर्न्स ट्राय करायला हवेत.
10 / 10
(Image Credit- Social Media)
टॅग्स : खरेदीब्यूटी टिप्ससाडी नेसणेस्टायलिंग टिप्स