चांदीच्या पैंजणांच्या १० डेलिकेट, ट्रेंडी डिजाईन्स; मिनिमलिस्टिक स्टाईल-पैंजणांना मॉडर्न लूक येईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:37 IST
1 / 10सध्या बाजारात जास्त नक्षीकाम नसलेले पण साधे आकर्षक मिनिमलिस्टिक स्टाईलचे नाजूक पैंजण खूपच लोकप्रिय आहेत. (Silver Anklets Latest Designs)2 / 10 बारीक आणि नाजूक चांदीच्या एकाच पट्टीतले पैंजण रोजच्या वापरासाठी अधिक पसंत केले जात आहेत जे आरामदायक असतात. (Silver Payal Latest Designs)3 / 10काही पैंजणांमध्ये देव-देवतांचे किंवा पारंपारिक नक्षीकाम असलेले छोटे पेंडेंट वापरले जात आहेत. जे खास प्रसंगी शोभून दिसतात. (Stylish Silver Anklet Collection)4 / 10 चांदण्या, हार्ट शेप, फुलपाखरं,छोटे मोती क्रिस्टल्स असलेले लटकन, जोडलेले पैंजण मुलींमध्ये अधिक पसंतीस उतरत आहेत.5 / 10एकाच पायात दोन किंवा तीन बारीक चेन असलेले एकमेकांना जोडून घातले जाणारे लेयर्ड पैंजण ही नवीन फॅशन आहे.6 / 10 त्रिकोन, चौकोन किंवा षटकोन, पान अशा आकारांचा वापर करून पैंजणांना अधुनिक लूक दिला जातो.7 / 10पूर्वीच्या जाड पैंजणांपेक्षा आता अगदी छोटे आणि कमी घुंगरू असलेले किंवा घुंगरू नसलेले पैंजण फॅशनेबल मानले जातात.8 / 10केवळ पांढऱ्या चांदीऐवजी काही डिजाईन्समध्ये गुलाबी किंवा पिवळ्या पॉलिशचा वापर करून त्यांना वेगळा लूक दिला जातो. 9 / 10दोन्ही पायांमध्ये न घालता फक्त एका पायात नाजूक पैंजण घालण्याचा ट्रेंडही सध्या दिसून येत आहे त्याजा एन्कलेट म्हणतात.10 / 10पारंपारीक आणि अधुनिक डिजाईन्सचे मिश्रण करून तयार केलेले पैंजण प्रत्येक वयोगटातील महिलांना आकर्षीत करत आहेत.