Join us
Daily Top 2 Weekly Top 5

१८०० रूपयांत ब्लाऊजवर करा क्लासी आरी वर्क ; १० डिजाईन्स, ब्लाऊज एकदम रॉयल दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:00 IST

1 / 10
१८०० रुपयांच्या बजेटमध्ये आरी वर्कचे एक सुंदर आणि सुबक ब्लाऊज तयार करणं सहज शक्य आहे. या किमतीत तुम्हाला कोणत्या प्रकारचे पर्याय मिळू शकतात ते पाहूया. (Royal Aari Work Designs)
2 / 10
१८०० रूपयांच्या बजेटमध्ये तुम्ही ब्लाऊजच्या गळ्याला आणि बाह्यांना प्राधान्य देऊ शकता. यात प्रामुख्यानं वेली, बुट्टे, बॉर्डर वर्क अत्यंत मोहक दिसते. (Aari Work Designs For Blouse)
3 / 10
या किमतीत दर्जेदार रेशीम धागे, मणी, चकत्या आणि साकळी टाका. यांचा वापर करून डिझाईन्स बनवता येते.
4 / 10
जर तुम्हाला थोडा ग्रँड लूक हवा असेल तर सोन्याच्या किंवा चांदीच्या रंगाच्या झरदोजी धाग्याचा थोडा वापर करता येईल.
5 / 10
हे बजेट केवळ कारागिरीसाठी असेल तर तुम्ही सिल्क काठपदर किंवा वेलवेट अशा कोणत्याही कापडावर हे काम करून घेऊ शकता.
6 / 10
रेडीमेड ब्लाऊज घेण्यापेक्षा तुमच्या साडीच्या रंगाशी जुळणारे धागे निवडून तुम्ही स्वत:चे डिझाईन कस्टमायजेशन करून घेऊ शकता.
7 / 10
आरी वर्कमुळे ब्लाऊजला एक प्रकारचा रॉयल लूक मिळतो. जो लग्नसमारंभात किंवा सणासुधीला उठून दिसतो.
8 / 10
या बजेटमध्ये ब्लाऊजच्या गळ्याभोवती २ ते ३ पदरी नाजूक बॉर्डर आणि बाह्यांवर साधी पण आकर्षक डिझाईन घेता येते.
9 / 10
संपूर्ण ब्लाऊज भरगच्च करण्याऐवजी पाठीवर किंवा बाह्यांवर ठराविक अंतरावर छोटे छोटे आरी बुट्टे काढल्यास ब्लाऊज अत्यंत सुबक आणि क्लासी दिसते.
10 / 10
कमी कामातही आरी वर्कचे फिनिशिंग उत्तम राहते. हे काम हातानं केलेले असल्यामुळे यंत्राच्या कामापेक्षा जास्त काळ टिकते आणि साडीच्या कोणत्याही प्रकारावर शोभून दिसते.
टॅग्स : खरेदीफॅशनस्टायलिंग टिप्स