By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:57 IST
1 / 10रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) नेसलेली साडी ही अत्यंत साधी पण मनमोहक दिसत आहे. ही साडी मलमल कॉटन या प्रकारातील एक उत्कृष्ट दर्जाची साडी आहे. (Rashmika's Mulmul Cotton Saree) 2 / 10मलमल हे कापड अत्यंत मऊ आणि वजनाला हलके असते. रश्मिकाच्या साडीचा जो नैसर्गिक फॅलो दिसत आहे तो मलमल कापडामुळेच शक्य होतो.( Mul Cotton Mirror Work Saree In 10 Colors)3 / 10 ही साडी पीच किंवा सौम्य गुलाबी रंगाची आहे. मलमल कापडावर हे पेस्टल रंग अतिशय खानदानी आणि कूल दिसतात.4 / 10 मलमल कापड शरीराला अतिशय मऊ लागते. रश्मिकानं ज्या प्रकारे ही साडी ड्रेप केली आहे. त्यावरून ती खूपच मऊ असल्याचं जाणवतं.5 / 10 साडीवर सोनेरी रंगाचे छोटे गोल्डन बुट्टे किंवा सिक्विन वर्क आहे. साध्या मलमल साडीला यामुळे एक फेस्टिव्ह किंवा सणासुधीचा लूक मिळाला आहे.6 / 10मलमलचे वैशिष्ट्य म्हणजे ते थोडं पारदर्शक असते. जे या फोटोमध्ये पदराच्या बाजूनं स्पष्टपणे जाणवत आहे.7 / 10 हे कापड हवा खेळती ठेवणारं असल्यामुळे उन्हाळ्यात किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या कार्यक्रमासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.8 / 10मलमल साडी नेसल्यामुळे शरीराला चिकटून राहते. यामुळे ती नेसणाऱ्या व्यक्तीला एक स्लिम आणि ग्रेसफुल लूक मिळतो.9 / 10या साडीत तुम्हाला हवेतसे डार्क, लाईट शेडचे सर्व प्रकारचे रंगांचे पर्याय मिळतील. 10 / 10मलमलच्या साडीवर रश्मिकानं घातलेले पारंपारीक सोन्याचे दागिने आणि झुमके पेहरावाला पूर्णत्व देतात.