Join us   

रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या अप्रतिम भेटवस्तू; कमी बजेटमध्येही सुंदर गिफ्ट्स, पाहा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 9:34 AM

1 / 8
रक्षबंधन (Raksha Bandhan) हा असा सण ज्याची वाट घराघरातील महिला आतूरतेन पाहत असतात. लाडक्या भावाकडून हक्काने भेटवस्तू घेण्यासाठी हा बहिणींना हा सण हवाहवासा वाटतो. रक्षाबंधनाला बहिणींना गिफ्ट देण्यासाठी कमीत कमी बजेटमध्ये स्पेशल भेटवस्तू पाहूया. (Best Gifts Ideas for Raksha Bandhan)
2 / 8
मुलींना ज्वेलरीजची खूप आवड असते. इअररिंग्स, हाताचे ब्रेसलेस, नथ, पैंजण, किंवा नेक असे बरेच ऑपश्न्स आहेत. तुम्ही १०० रूपयांपासून ३०० रूपयांपर्यंत वेगवेगळ्या पॅटर्नचे ज्वेलरी सेट गिफ्ट करू शकता
3 / 8
तुमची बहिण कॉलज किंवा ऑफिसला जात असेल तर तिला उपयोगी पडेल अशी बॅग तुम्ही भेट म्हणून देऊ शकता किंवा हातातली छोटी पर्स सुद्धा गिफ्ट द्यायला मस्त पर्याय आहे.
4 / 8
परफ्यूम तुम्हाला २०० ते ५०० रूपयांपर्यंत अगदी सहज उपलब्ध होतील. तुम्ही ३ किंवा २ परफ्यूम्सचा सेट सुद्धा देऊ शकता.
5 / 8
चांदीची वाटी आणि चमचा किंवा रोजच्या उपयोगात असलेलं एखादं आकर्षक भांडं तुम्ही ताईला देऊ शकता. याशिवाय डिनर सेट, किंवा कप सेट हा देखील सुंदर पर्याय आहे.
6 / 8
बहिणीचं नाव लिहिलेली कस्टमाईज बॉटल सुद्धा तुम्ही देऊ शकता. वॉटर बॉटल द्यायची नसेल तर कॉफी मग देऊ शकता. यात बरेच पर्याय तुम्हाला मिळतील. गिफ्ट शॉपमध्ये किंवा ऑनलाईन तुम्हा आकर्षक मग कमी खर्चात मिळतील.
7 / 8
जर गिफ्ट घ्यायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही बहिणीला आवडतं चॉकलेट किंवा चॉकलेटचा बॉक्स देऊ शकता.
8 / 8
स्मार्टवॉचचा क्रेझ सध्या खूप आहे तुम्ही बहिणीला स्मार्ट वॉच गिफ्ट करू शकता किंवा तिच्या आवडीच्या पॅटर्नचे वॉच गिफ्ट करू शकता. सध्या स्मार्ट वॉच किंवा इतर वॉचही इएमआयवर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतंही वॉच गिफ्ट करू शकता.
टॅग्स : खरेदीरक्षाबंधनभारतीय उत्सव-सण