Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्नसराईसाठी घ्या खास राजवाडी वाटी मंगळसुत्र, ८ युनिक डिजाईन्स; पारंपारीक साजमध्ये रॉयल लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:47 IST

1 / 8
राजवाडी वाटी मंगळसूत्र (Rajwadi Vaati Mangalsutra) सध्या दागिन्याच्या जगात प्रचंड लोकप्रिय आहेत. ही मंगळसूत्र केवळ पारंपारीक नसून ते एक रॉयल लूक देतात. याच्या डिझाइन्स आणि वैशिष्ट्यांबाबत समजून घेऊ. ( 8 Designs Of Rajvadi Mangalsutra)
2 / 8
सध्या सोशल मीडियावर राजवाडी मंगळसूत्र बरेच व्हायरल होत आहेत. कोणत्याही साडीवर ही मंगळसूत्र घातल्यास सुंदर लूक दिसतो. तसंच फार दागिने घालण्याची आवश्यकताही नसते. (Latest Designs Of Rajvadi Mangalsutra)
3 / 8
ही मंगळसूत्र हेवी दिसत असली तरी अतिशय लाईटवेट असतात. किंमतही फार नसते.त्यामुळे लग्नकार्यासाठी किंवा सणवार असतील तर तुम्ही अशी प्रकारचे मंगळसूत्र घालू शकता.
4 / 8
सध्या पिवळ्या धमक सोन्यापेक्षा मॅट फिनिश किंवा एंटीक गोल्ड लूक असलेल्या राजवाडी मंगळसूत्रांना महिलांची जास्त पसंती असते.
5 / 8
अनेक डिझाईन्समध्ये वाट्यांच्या मध्यभागी लाल किंवा हिरव्या रंगाचे खडे किंवा नाजूक मीनाकारी केलेली असते ज्यामुळे त्याला रंगत येते.
6 / 8
ही मंगळसूत्र सिंगल पदरी किंवा दोन-तीन पदरी काळ्या मण्यांच्या माळेत उपलब्ध असतात शाही लूकसाठी अनेकदा जाड माळ वापरली जाते. काही नवीन डिजाई्समध्ये वाट्यांच्या कडांना झुमका स्टाईल किंवा लहान नाजूक घुंगरू लावलेले असतात.
7 / 8
राजवाडी पॅटर्नमध्ये लांब मंगळसूत्राचा कल जास्त आहे. जे लग्नसमारंभ किंवा सणासुधीला साडीवर विशेष शोभून दिसतात.
8 / 8
वाट्यांच्या आजूबाजूला लहान सोन्याचे मणीकिंवा कोल्हापूरी साजाप्रमाणे गुंफण केलेली असते. अस्सल सोन्याव्यतिरिक्त 1 ग्रॅम गोल्ड प्लेटेड राजवाडी मंगळसूत्राची सध्या मोठी बाजारपेठ आहे जी बजेटमध्ये मिळतात.
टॅग्स : खरेदीफॅशनदागिने