लग्नकार्यासाठी खास प्युअर सिल्क हँडलूम पैठणी; ८ आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक दिसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:41 IST
1 / 8पैठणी (Paithani) साडीही महाराष्ट्राची शान मानली जाते तिला साड्यांची महाराणी असंही म्हणतात. सुद्ध रेशीम हातमाग पैठणीचीी मुख्य वैशिष्ट्ये ही आहेत. (8 Attractive Colors Of Handloom Paithani Silk Saree))2 / 8ही साडी उत्कृष्ट दर्जाच्या शुद्ध रेशमापासून हातानं विणली जाते. त्यामुळे साडीचा पोत मऊ पण वजनदार असतो. (Pure silk handloom Paithani for wedding Season)3 / 8हँडलूमध्ये हातमाग. म्हणजेच ही साडी कोणत्याही मशीनचा वापर न करता कुशर कारागीर पूर्णपणे हातानं विणतात. एका साडीला पूर्ण होण्यासाठी काही आठवड्यांपासून ते अनेक महिन्यांपर्यंत वेळ लागू शकतो. 4 / 8लग्नसराईसाठी तुम्ही अशा प्युअर सिल्क हँडलूमच्या पैठण्या विकत घेऊ शकता. यात तुम्हाला ट्रेंडी आणि आकर्षक कलर कॉम्बिनेशन मिळतील.5 / 8पदर आणि नक्षीकाम जितकी गुंतागुंतीची आणि भरगच्च असते तितका वेळ जास्त लागतो आणि किंमत वाढते.6 / 8या साड्यांची किंमत १० हजारांपासून सुरू होऊन २५ ते ५० हजारांपर्यंत असते. येवला किंव पैठण येथिल केंद्रातून खरेदी केल्यास थोडी किंमत कमी होऊ शकते. 7 / 8हातमागावर बनवलेल्या शुद्ध पैठणीवर सहसा मोठी सवलत मिळत नाही कारण ती कलाकुसर खूप मोलाची असते.8 / 8लग्नसराईसाठी या साड्या उत्तम पर्याय आहेत. नववधूसाठी किंवा जवळच्या लोकांना घेण्यासाठी या साड्या घेऊ शकता. तर तुम्हाला कमी किमतीत हवी असेल तर या डिजाईन्समध्ये तुम्हाला सेमी सिल्क पैठणीसुद्धा उपलब्ध होईल.