Join us
Daily Top 2 Weekly Top 5

नववधूसाठी मोठ्या मंगळसुत्राचे १० युनिक पेंडंट डिझाईन्स; कमी वजनात घ्या ठसठशीत मंगळसूत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:04 IST

1 / 10
लग्नसराईसाठी तुम्ही सोन्याचे पेंडंट बनवून घेऊ शकता. सोन्याच्या पेंडंटमध्ये तुम्हाला एकपेक्षा एक डिझाईन्स पाहायला मिळतील.(Pendant Designs for Long Mangalsutra)
2 / 10
३ ते ५ ग्रॅममध्ये तुम्हाला असे लाईटवेट पेंडंट मिळतील. मोठ्या मंगळसूत्रात हे पेंडंट उठून दिसतील.
3 / 10
महाराष्ट्रीयन पद्धतीचे दोन वाट्यांचे डिझाईन आजही खूप लोकप्रिय आहे, जे मोठे आणि भरगच्च असते.
4 / 10
या डिझाईनमध्ये मंदिराच्या कलाकुसरीची नक्षी किंवा देवी-देवतांचे स्वरूप कोरलेले असते, जे वधूच्या पारंपरिक वेशभूषेला शोभून दिसते.
5 / 10
कुंदन किंवा अनकट डायमंड्सचा वापर केलेले जड पेंडंट वधूच्या दागिन्यांमध्ये शाही थाट आणतात.
6 / 10
मोठ्या आकारात सोन्यासोबत बारीक नक्षी असलेला पेंडंट आधुनिक आणि आकर्षक दिसते.
7 / 10
पेंडंटमध्ये बारीक सोन्याच्या तारांचे जाळीदार काम केलेले असते, ज्यामुळे ते मोठे असूनही नाजूक दिसते.
8 / 10
जुन्या दागिन्यांसारखे मॅट फिनिश असलेले मोठे पेंडंट पारंपरिक लूकसाठी निवडले जातात.
9 / 10
एकापेक्षा जास्त थर असलेले किंवा झुंबरसारखे लटकणारे पेंडंट भव्यता वाढवतात.
10 / 10
वधू-वरांच्या नावाचे पहिले अक्षर किंवा लग्नाची तारीख कोरलेले मोठे 'कस्टमाइज्ड' पेंडंट्स आता ट्रेंडमध्ये आहेत.
टॅग्स : शुभविवाहफॅशनदागिनेखरेदी