Join us

बघा मोत्याच्या चिंचपेटीचे वेगवेगळे प्रकार, लग्नकार्यात असा एक तरी दागिना आपल्याकडे पाहिजेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2024 13:19 IST

1 / 11
सोन्याच्या दागिन्यांची श्रीमंती वेगळी असली तरी मोत्यांच्या दागिन्यांचा रुबाबही काही कमी नसतो. म्हणूनच तर लग्नकार्यात घालायला आपल्याकडे मोत्याचे दागिने असायलाच पाहिजेत. त्यात चिंचपेटी, तन्मणी असे मोत्याचे दोनच दागिने घातले तरी गळा कसा भरल्यासारखा दिसतो.
2 / 11
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे लग्नकार्यात घालण्यासाठी मोत्याची सुंदर चिंचपेटी घ्यायची असेल तर त्याआधी चिंचपेटीचे हे काही प्रकार माहिती करून घ्या...
3 / 11
खाली- वर दोन्ही बाजूंनी माेती आवडत नसतील, तर हा एक प्रकार पाहा. ही चिंचपेटी काही भागांत मोत्याची ठुशी म्हणूनही ओळखली जाते.
4 / 11
चिंचपेटीला जो गुलाबी खडा असतो आणि त्याला वर- खाली मोती असतात, तो खडा म्हणजे पेटी म्हणून ओळखला जातो. पारंपरिक चिंचपेटीला १६ पेट्या असतात.
5 / 11
तसेच १६ पेट्या खूप भरगच्च वाटत असतील तर ५ पेट्या असणारी चिंचपेटीही घेतात. विशेषत: लहान मुलींसाठी ५ पेट्यांची किंवा ३ पेट्यांची चिंचपेटी घेतली जाते.
6 / 11
काही अशा डबलपेटी असणाऱ्या चिंचपेटीही मिळतात. ज्यांना खूप हेवी दागिने आवडतात, त्यांना ही चिंचपेटी आवडते.
7 / 11
हेवी दागिने आवडणाऱ्यांना चिंचपेटीचा हा प्रकारही आवडू शकतो.
8 / 11
चिंचपेटीची पेटी बहुतांशवेळा गुलाबी खड्यांमध्येच गुंफलेली असते. पण गुलाबी रंग नको असेल तर अशी हिरव्या रंगाचीही तुम्ही घेऊ शकता.
9 / 11
हल्ली ऑक्सिडाईज ज्वेलरीची खूप क्रेझ आहे. तशा साड्यांवर घालायला अशी ऑक्सिडाईज चिंचपेटीही हल्ली मिळत आहे.
10 / 11
या चिंचपेटीचा जो आकार आहे, अस आकार असणाऱ्या चिंचपेटीला नंदनंदिनी चिंचपेटी म्हणतात.
11 / 11
या चिंचपेटीला कस्तुरी चिंचपेटी म्हणून ओळखले जाते.
टॅग्स : खरेदीदागिनेलग्न