Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्न सोहळ्यासाठी खास पश्मिना सिल्क साडी; १० सुंदर रंग, २ हजारच्या आत घ्या भरजरी साडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:53 IST

1 / 10
पश्मिना सिल्क साडी ही भारतीय वस्त्रांमधील एक अत्यंत वैभवशाली आणि लोकप्रिय साडी आहे. सध्या ही साडी बरीच ट्रेंडींग आहे. (10 Color Of Pashmina Silk Saree)
2 / 10
ही साडी अस्सल पश्मिना लोकर आणि सिल्क यांच्या मिश्रणातून तयार केली जाते. यामुळे साडीला एक वेगळीच चमक आणि मऊपणा येतो. (Pashmina Silk Saree For Wedding Season)
3 / 10
पश्मिना सिल्क साड्या त्यांच्या वजनाला अत्यंत हलक्या आणि उबदार फॅब्रिकसाठी ओळखल्या जातात. या साड्या नेसताना अतिशय सुटसुटीत आणि सुखद अनुभव देतात. (Pashmina Silk Saree Designs)
4 / 10
यावर प्रामुख्यानं काश्मिरची पारंपारिक काश्मिरी काशिदाराकी किंवा कानी विणकाम पाहायला मिळते हे काम अत्यं बारीक आणि कलाकुसरीचे असते.
5 / 10
या साड्यांवर पाना-फुलांचे वेल, आंब्याची नक्षी आणि निसर्गातील विविध घटकांचे सुंदर चित्रण असते. काही साड्यांच्या पदरावर संपूर्णपणे हातानं भरतकाम केलेले असते.
6 / 10
या सिल्कच्या साड्यांमध्ये गडद आणि पेस्टल दोन्ही प्रकारचे रंग उपलब्ध असतात. मरून, रॉयल ब्लू, बॉटल ग्रीन यांसारख्या गडद रंगांसोबत पीच, क्रिम आणि आकाशी अशा सौम्य रंगांना मोठी मागणी असते.
7 / 10
या साड्या सण-समारंभ, लग्नकार्य आणि थंडीच्या दिवसांतील खास कार्यक्रमांसाठी उत्तम पर्याय ठरतात.
8 / 10
कामाची गुंतागुंत आणि सिल्कच्या गुणवत्तेनुसार या साड्यांची किंमत साधारणपणे २ हजारांपासून पुढे सूरू होते.
9 / 10
पश्मिना सिल्क साडी नेसणं हे अभिजात आवडीचे प्रतीक मानले जाते. सध्या सोशल मीडियावर या साडीची बरीच चर्चा आहे.
10 / 10
या साड्यांमध्ये तुम्हाला पिवळा, मरून, हिरवा, ऑफ व्हाईट असे बरेच रंग पाहायला मिळतील.
टॅग्स : खरेदीफॅशन