Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्नसराईसाठी पैठणीचे खास प्रकार; ८ युनिक डिजाईन्स, किंमत-खासियत काय? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:49 IST

1 / 8
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि वस्त्रांची राणी मानली जाणारी पैठणी साडी हे केवळ एक वस्त्र नसून तो एक समृद्ध वारसा आहे. या विषयावर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. (Paithani For Wedding Function)
2 / 8
काही साड्यांच्या काठावर किंवा पदरावर मुनिया म्हणजेच लहान पोपटांची नक्षी विणलेली असते. ही अत्यंत लोकप्रिय आणि पारंपारीक मानली जाते. (Paithani Patterns)
3 / 8
पदरावर एक मोठा किंवा अनेक नक्षीदार मोरींची आकृती असते. लग्नसराईत या प्रकाराला मोठी मागणी असते. (Top 8 Paithani Designs With Price)
4 / 8
काही पैठण्यांमध्ये फुलांच्या वेली आणि पानांची नाजूक नक्षी असते. जी साध्या पण मोहक लूकसाठी ओळखली जाते.
5 / 8
कड किंवा दुपदरी पैठणी साडी दोन्ही बाजूंनी सारखीच दिसते तिचे विणकाम अत्यंत घट्ट असते.
6 / 8
अस्सल पैठणी पूर्णपणे हातानं विणली जाते. तर कमी खर्चात मिळणारी पैठणीत यंत्रांवर तयार होते.
7 / 8
अस्सल पैठणी ही नैसर्गिक रंगाच्या रेशमापासून बनवलेली असते. या साडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा पदर. पदरावरचे मोर आणि फुलांची नक्षी
8 / 8
मशीन मेड पॉवरलूम पैठणी २५०० ते ८००० रूपयांची असते, सेमी पैठणी ८००० ते १८००० रूपयांपर्यंत असते. शुद्ध रेशमी हातमागाची पैठणी २० हजार ते ५० हजारांपर्यंत मिळते. शुद्ध हातमाग २ ते ६ महिन्यांच्या कालावधीत तयार होते. ६० हजार ते २ लाख पन्नास हजार रूपये ही पैठणी तयार करण्यासाठी लागतात. कस्टम मेड पैठणी ३ लाखांच्या पुढे असते.
टॅग्स : खरेदीफॅशनशुभविवाह