Join us
Daily Top 2 Weekly Top 5

आईच्या जुन्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १२ पॅटर्न्स, साध्या ड्रेसमध्ये युनिक लूक मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:02 IST

1 / 12
आपल्याकडे अनेकदा आईच्या किंवा आजीच्या भारी सिल्कच्या,पैठणी किंवा काठ पदराच्या साड्या कपाटात पडून असतात. त्यातून नवीन ड्रेस शिवल्यानं त्या मौल्यवान कापडाचा वापर उत्तम होतो. (Old Saree Dresses Latest Idea)
2 / 12
साडीच्या लांबीमुळे त्यातून अनारकली ड्रेस, लॉग्न गाऊन, कुर्ता किंवा नऊवारी साडीचा ड्रेस सहज शिवता येतो.
3 / 12
साडीच्या सुंदर काठांचा वापर आपण ड्रेसच्या गळ्याला, हाताल किंवा खालच्या घेराला लावण्यासाठी करू शकतो. ज्यामुळे ड्रेसला डिझायनर लूक मिळतो.
4 / 12
साडीपासून इंडो वेस्टर्न कपडे जसं की स्कर्ट-टॉप, श्रग किंवा प्लाझो पँट शिवणं सध्या खूपच लोकप्रिय आहे.
5 / 12
जुन्या साडीशी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात. त्यामुळे त्या साडीचा ड्रेस परिधान केल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो.
6 / 12
नवीन भारी ड्रेस विकत घेण्यापेक्षा जुन्या साडीचा वापर केल्यानं कमी खर्चात एक भव्य आणि पारंपारीक ड्रेस तयार होतो.
7 / 12
नसाडीचे कापड आणि नक्षी अद्वितीय असल्यामुळे तुमचा ड्रेस बाजारातील रेडीमेड कपड्यांपेक्षा आणि उठावदार दिसतो.
8 / 12
साडीचे कापड अनेकदा मऊ किंवा झिरझिरीत असते. ड्रेसला चांगला आकार आणि मजबूत मिळण्याासठी दर्जेदार अस्तर वापरणं आवश्यक आहे.
9 / 12
साडीच्या पदराचा वापर करून आपण ड्रेसचा पुढचा भाग किंवा मागील गळा आकर्षक बनवू शकता. उरलेल्या काठांपासून मॅचिंग पोटली बॅग किंवा हेअर बँड देखील बनवता येतात.
10 / 12
जर साडी पूर्णपणे वापरण्यायोग्य नसेल तर त्यातील चांगल्या भागापासून लहान मुलांचे परकर-पोलके, फ्रॉक किंवा मुलांसाठी कुर्ती जॅकेट शिवता येतात.
11 / 12
लग्नसमारंभासाठी तुम्ही असं सुंदर जॅकेट शिवून घेऊ शकता. सध्या पैठणी जॅकेटची बरीच क्रेझ दिसून येते.
12 / 12
या ड्रेसेसमध्ये तुम्हाला सुंदर तितकाच कम्फ्रर्टेबल लूक मिळेल ६०० रूपयांपासून ते २००० रूपयांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साडीचे फ्रॉक्स शिवून मिळतील.
टॅग्स : फॅशनखरेदी