आईच्या आजीच्या जुन्या साड्यांचा सुंदर ड्रेस शिवा-पहा १० डिझाईन्स. मायेची ऊब आणि मॉडर्न लूक दोन्ही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:14 IST
1 / 8 जुन्या साडीचा पुनर्वापर करून नवीन ड्रेस शिवणं ही एक अतिशय कल्पक आणि फायदेशीर कल्पना आहे. जुन्या साड्यांपासून तयार केलेले ८ ड्रेसेसचे पॅटर्न्स पाहूया. (Old Saree Dresses Ideas)2 / 8कपाटात पडून असलेल्या जुन्या, जड किंवा सिल्कच्या साड्यांपासून आपण अतिशय सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस तयार करू शकता. (Old Saree Dresses 8 Patterns)3 / 8साडीपासून तुम्ही अनारकली ड्रेसेस, लॉन्ग गाऊन्स, कु्र्ता, नऊवारी पॅटर्नचा वन-पीस सुद्धा शिवू शकता.4 / 8साडीच्या काठांचा वापर करून गळा, बाह्या किंवा ड्रेसचा खालचा घेर आकर्षक बनवता येतो. यामुळे ड्रेसला डिझायनर लूक मिळतो.5 / 8साडीचा पदर हा ड्रेसच्या पुढच्या भागासाठी किंवा ओढणीसाठी वापरता येतो. ज्यामुळे ड्रेस अधिक उठावदार दिसतो.6 / 8नवीन कापड विकत घेण्यापेक्षा जुन्या साडीचा वापर केल्यास पैशांचीही बचत होते. जर साडीची लांबी कमी असेल तर त्यापासून लहान मुलांचे फ्रॉक्स, परकर-पोलके किंवा मुलांसाठी कुर्ती-धोती शिवता येतात.7 / 8जर साडीची लांबी कमी असेल तर त्यापासून लहान मुलांचे फ्रॉक्स, परकर-पोलकं किंवा मुलांसाठी कुर्ती-धोती सेट्स शिवता येतात.8 / 8अशा प्रकारचे ड्रेसेस सण-समारंभ लग्नकार्य किंवा पूजेसाठी अगदी योग्य ठरतात. कारण त्यात पारंपारीक आणि अधुनिक अशा दोन्ही गोष्टींचा संगम असतो