By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:42 IST
1 / 10कलांजली पैठणी ही तिच्या मऊ सिल्क कापडामुळे नेसण्यासाठी अतिशय हलकी आणि आरामदायक ठरते. (New pattern of Kalanjali Paithani)2 / 10या साडीवर नाजूक जरकाम आणि आकर्षक मोर-पोपाटीची नक्षी असते ती महिलांना भूरळ घालते.3 / 10सध्याच्या फॅशननुसार या साडीचे रंग आणि पेस्टल शेड्स अतिशय वेगळे आणि उठून दिसणारे आहेत.4 / 10 या साडीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यासोबत मिळणारे आरी वर्कचे ब्लाऊज.5 / 10ब्लाऊजवर हातानं केलेलं क्लिष्ट आणि भरभक्कम आरी वर्क साडीच्या सौंदर्यात अधिक भर घालते.6 / 10आरी वर्क केलेल्या ब्लाऊजमुळे साडीला एक विशेष राजेशाही आणि अधुनिक लूक येतो.7 / 10लग्नसमारंभांसाठी सण, उत्सव किंवा विशेष कार्यक्रमांसाठी ही साडी एक उत्तम पर्याय ठरत आहे. 8 / 10पारंपारीक काठ पदर आणि मॉडर्न वर्क यामुळे तरूण मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.9 / 10सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटींनी ही साडी प्रमोट केल्यामुळे लोकप्रियता अधिक वाढली आहे.10 / 10कमीत कमी किमतीत उत्तम दर्जा आणि रेडीमेड हेवी ब्लाऊज मिळत असल्यानं ही पैठणी सध्या ट्रेंडींग आहे.