Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पदरावर सुंदर नथ सजलेली काडीयाल पैठणी; १० रंग, डिझायनर ब्लाऊजही मिळते सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:48 IST

1 / 12
नथीच्या डिझाईन्सची सिरोस्की वर्क काडीयाल पैठणी आणि त्यावर आरी वर्क ब्लाऊज हे सध्याच्या फॅशनमधील एक अतिशय रॉयल आणि प्रिमियम कॉम्बिनेशन आहे. (Nath Sirosji Work Kadiyal Paithani)
2 / 12
या पैठणीच्या पदरावर आणि बुट्ट्यांमध्ये पारंपारीक नथीची डिझाईन विणलेली असते जी साडीला एक महाराष्ट्रीयन लूक देते. (Kadiyal Paithani Rich Pallu With Aari work Blouse Piece)
3 / 12
साडीवरील नथीच्या डिझाईन्सना अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्यावर सिरोस्की खड्यांचे बारीक काम केले जाते. ज्यामुळे साडी प्रकाशात चमकते. (Aari work Blouse Piece 10 Designs)
4 / 12
कडीयाल प्रकारात साडीचा काठ हा साडीच्या मुख्य रंगापेक्षा वेगळ्या आणि गडद रंगाचा असतो जो साडीला एक उठावदार कॉन्ट्रास्ट देतो.
5 / 12
या साडीवर हातानं केलेले आरी वर्क ब्लाऊज असते. यात साडीच्या पदरावरील नथीच्या डिझाईन्सशी जुळणारे नक्षीकाम रेशमी धागे आणि मण्यांच्या साहाय्यानं ब्लाऊजच्या पाठीवर आणि बाह्यांवर केले जाते.
6 / 12
सिरोस्कीची चमक आणि आरी वर्कची नजाकत यामुळे ही साडी कोणत्याही लग्नसमारंभात किंवा मोठ्या उत्सवात उठून दिसते.
7 / 12
ब्लाऊजच्या पाठीवर आणि बाह्यांवर साडीच्या पदरावरील नथीसारखेच डिझाईन्सचे आरी वर्क असते.
8 / 12
आरी वर्क करताना रेशीम धागे, टिकल्या आणि मण्यांचे वापर करून नक्षीकाम अधिक सुंदर बनवले जाते.
9 / 12
लग्नसमारंभासाठी किंवा स्वत:च्या लग्नासाठी ब्रायडल लूक म्हणऊन या साडीला सध्या खूपच मागणी आहे.
10 / 12
ही साडी दिसायला जरी जड वाटली तरी अधुनिक विणकामामुळे नेसायला अतिशय आरामदायी असते.
11 / 12
हे संपूर्ण कॉम्बिनेशन नेसल्यावर कोणत्याही अतिरिक्त जड दागिन्यांची गरज पडत नाही. इतका हा पेहराव परीपूर्ण दिसतो.
12 / 12
या साड्यांमध्ये तुम्हाला फार जास्त दागिने न घालताही सुंदर, भरगच्च लूक मिळतो.
टॅग्स : खरेदीफॅशनसाडी नेसणे