By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:25 IST
1 / 10लग्नात नेसण्यासाठी मुनिया पैठणी हा उत्यंत रिच आणि उत्तम पर्याय आहे. मुनिया पैठणी ही महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेतील एक अत्यंत शाही आणि लोकप्रिय साडी आहे.2 / 10 या साडीच्या काठावर मुनिया म्हणजेच लहान पोपटांची आकर्षक नक्षी विणलेली असते. यामुळे कोणत्याही समारंभात तुम्ही उठून दिसता.3 / 10पोपटांचे हे डिझाईन्स रेशमी धाग्यांनी किंवा सोनेरी जरीनं तयार केले जाते. वेगवेगळ्या रंगात तुम्हाला ही नऊवारी साडी उपलब्ध होईल.4 / 10सिंगल मुनिया साडी सध्या लग्नसराईमध्ये बरीच उठून दिसते. 5 / 10 या साडीचा पदर अत्यंत भरगच्च असून त्यावर मोर आणि मोर आणि फुलांची कलात्मक नक्षी असते.6 / 10ही साडी नेसल्यावर स्त्रियांना एक राजेशाही आणि पारंपारीक मराठमोळा लूक मिळतो.7 / 10लग्नात नेसण्यासाठी किंवा मुंजेला नेसण्यासाठी ही साडी आजही पहिली पसंती ठरत आहे.8 / 10 मोरपंखी, जांभळा, पोपटी आणि लाल अशा गडद रंगांमध्ये ही साडी अधिक खुलून दिसते.9 / 10ही साडी शुद्ध रेशीमपासून तायर केली जाते. ज्यामुळे तिला विशेष चमक असते. 10 / 10आजकाल ही साडी स्टिच स्वरुपातही मिळते. ज्यामुळे ती नेसणं खूपच सोपं होतं. मुनिया पैठणी नऊवारी हे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारश्याचे प्रतीक मानले जाते.