लग्नसोहळ्यात उठून दिसेल खास मुनिया पैठणी; ८ आकर्षक रंगात, साडीत शाही लूक मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:11 IST
1 / 8मुनिया पैठणी ही महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्र परंपरेतील एक अतिशय देखणा आणि लोकप्रिय प्रकार आहे. साडीच्या काठावर विणलेल्या मुनिया विशिष्ट नक्षीमुळे तिला हे नाव मिळाले. (Muniya Paithani In 8 Attractive Colors)2 / 8साडीचे आकर्षक रंग आणि डिझाईन्स ट्रेंडींग यामुळे साडी कायम चर्चेत असते. (Single Muniya Paithani Collection)3 / 8या साडीच्या संपूर्ण भागावर सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने विणलेले लहान गोल बुट्टे, चांदणी किंवा नाजूक फुलं असतात.4 / 8 पदरावर मोराची जोडी, कमळाची फुलं किंवा पोपट-मैना यांसारखी पारंपारीक नक्षी विणलेली असते.5 / 8या पैठणीत हळदी पिवळा रंग, जांभळा, हिरवा, मोरपिशी, चिक्कू रंग असे रंगांचे पर्याय तुम्हाला मिळतील.6 / 8हल्ली पेस्टल कलर्स जसं की बेबी पिंक, पीच, पिस्ता ग्रीनमध्येही मुनिया पैठणी उपलब्ध आहे जी तरूणींमध्ये लोकप्रिय आहे.7 / 8या साडीचे काठ सोनेरी जरीचे असल्याने ती नेसल्यावर एक वेगळाच रॉयल लूक मिळतो.8 / 8या पैठणीमध्ये 'डबल मुनिया' आणि ट्रिपल मुनिया साडीला सध्या जास्त मागणी आहे. कारण तिचे काठ अधिक रुंद आणि उठावदार दिसतात.