By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:04 IST
1 / 10मॅक्सी विथ दुपट्टा सध्या खूपच ट्रेंडीग आहे. हल्ली महिलांच्या फॅशनमध्ये सोय आणि स्टाईल यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. (Maxi With Dupatta For Women)2 / 10 घरामध्ये वावरताना मॅक्सी अत्यंत आरामदायक असते पण अचानक कोणी पाहूणे आले किंवा जवळच्या दुकानात जायचे असेल तर कपडे बदलावे लागतात. पण सोबत मॅचिंग दुपट्ट असल्यामुळे हा त्रास वाचतो. (Maxi With dupatta For Women 10 Patterns)3 / 10कॉटनच्या सुंदर प्रिंटेट गाऊवर दुपट्टा घेतल्यामुळे त्याला एक एथनिक सूट किंवा कुर्ता सेटसारखा लूक येतो. जो घराबाहेर जाण्यासाठी योग्य वाटतो.4 / 10हे गाऊन प्रामुख्यानं उच्च दर्जाच्या सुती किंवा रेयॉन कापडात उपलब्ध आहेत. त्यावर जयपुरी प्रिटं, इकत किंवा फ्लोरल डिझाईन्स असून दुपट्टाही त्याच रंगाचा किंवा कॉन्ट्रास्ट शेडमध्ये मिळतो.5 / 10गृहिणी किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिलांसाठी ही फॅशन वरदान ठरत आहे. यामुळे सतत कपडे बदलण्याचा वेळ आणि कष्ट वाचतात.6 / 10यात मॅक्सी दुपट्टा सेट्समध्ये महिलांना खूपच आरामदायक लूक मिळतो तसंच. कॅरी करण्यासाठी एकदम सुटसुटीत असं हे पॅटर्न आहे.7 / 10मिशो या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्हाला ५०० रुपयांपासून तुम्हाला असे सेट्स वेगवेगळ्या रंगात मिळतील.8 / 10सध्या ऑनलाईन मार्केट आणि स्थानिक बाजारपेठात हे गाऊन विथ दुपट्टा सेट अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत.9 / 10ही फॅशन आराम आणि डिसेंन्सी यांचा एक उत्तम संगम आहे. ज्यामुळे महिलांना दिवसभर आत्मविश्वासानं वावरता येते.10 / 10या गाऊन्समध्ये तुम्हाला फुल स्लिव्हज, हाफ स्लिव्हज असे बरेच पर्याय मिळतील.