संक्रांतीला नेसा लेटेस्ट पॅटर्नच्या काळ्या साड्या, ७ डिझाईन्स, ऑफिसवेअरसाठीही सुंदर दिसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 23:22 IST
1 / 7मकर संक्रांतीला (Makar Sankranti) काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे. ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि शोभून दिसेल असा लूक हवा असेल तर तुम्ही खालील प्रकारे साड्यांची निवड करू शकता. (Makar Sankranti Special Black Saree)2 / 7ऑफिससाठी कॉटन किंवा लिनन साड्या सर्वात आरामदायी आणि सुंदर दिसतात. यावर साधी कॉन्ट्रास्ट बॉर्डर असल्यास ती अधिक खुलून दिसतं3 / 7जर ऑफिसमध्ये संक्रांतीचा मोठा कार्यक्रम असेल तर तुम्ही काळी काठ पदर असलेली सिल्क साडी नेसू शकता. यावर पारंपारीक हलव्याचे दागिने खूपच सुंदर दिसतात.4 / 7या साड्या वजनाला हलक्या दिसायला रॉयल असतात. काळ्या रंगाच्या चंदेरी साडीवर सोनेरी बुट्टी असेल तर ती ऑफिसच्या वातावरणासाठी एकदम योग्य ठरते. 5 / 7जर तुम्हाला साडी सांभाळणं कठीण जात असेलं तर सॉफ्ट जॉर्जेट काळी साडी निवडा. यावर हलकी एम्ब्रॉयडरी किंवा सिक्वेन्स वर्क असल्यास ती प्रोफेशनल तरीही सणानिमित्त खास वाटते.6 / 7 काळ्या साडीवर तुम्ही हाय नेक ब्लाऊज, शर्ट स्टाईल ब्लाऊज किंवा एखादं स्टायलिश जॅकेट घालून तुमचा लूक अधिक मॉडर्न करू शकता.7 / 7जर तुमचा बजेट जास्त असेल आणि घरी संक्रांत साजरी करणार असाल तर ही साडी नेसू शकता.