Makar Sankranti 2025 : संक्रांतीसाठी खास काठापदराची काळी साडी; ८ नवीन डिझाईन्स-बजेट कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:50 IST
1 / 8मकर संक्रांतीसाठी (Makar Sankranti 2025) काळी काठ पदराची साडी बऱ्याच महिला नेसतात. मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. (Makar Sankrati Special Saree Designs)2 / 8काळी काठ पदराची साडी नेसल्यानं एक अतिशय देखणा आणि अस्सल महाराष्ट्रीयन लूक मिळतो.3 / 8संक्रांतीच्या काळात थंडी असते त्यामुळे काळ्या रंगाच्या साडीमुळे शरीरात उबदारपणा टिकून राहण्यास मदत होते.4 / 8 काळ्या रंगावर जरतारी किंवा सोनेरी काठ असतील तर साडीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.5 / 8तुम्ही संक्रांतीसाठी काळी पैठणी, इरकल, खण साडी किंवा सिल्कची साडी निवडू शकता.6 / 8 काळ्या साडीवर सोन्याचे दागिने किंवा कोल्हापूरी साज अतिशय उठून दिसतो.7 / 8 काळा रंग कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही त्यामुळे तुमच्याकडे काळ्या रंगाच्या साड्या असायलाच हव्यात.8 / 8काळी काठ पदराची साडी तरूण मुलींपासूनते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनाच शोभून दिसते. अनेक ठिकाणी वाण लुटताना काळ्या वस्त्राला विशेष मान दिला जातो.