By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:03 IST
1 / 8महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2026) दिनाला पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसण्याला विशेष महत्व दिले जाते. पांढरा रंग हा शांतता, पवित्रता आणि सात्विकतेचे प्रतीक मानला जातो. (8 Beautiful White Saree Designs For Mahashivratri)2 / 8पांढरा रंग नैसर्गिक सौंदर्याला अधिक खुलवतो. महाशिवरात्रीला पहाटे मंदिरात जाताना किंवा अभिषेक करताना पांढऱ्या साडीतील महिलांचे व्यक्तीमत्व अत्यंत सौम्य आणि प्रसन्न दिसते.3 / 8आजकाल पांढऱ्या साडीवर लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे काठ असलेली क्लासिक कॉम्बिनेशन्स खूप लोकप्रिय आहेत. यामुळे परंपरेसोबतच तुमचा फॅशन सेन्सही जपला जातो. 4 / 8महादेवाला साधेपणा प्रिय असल्यामुळे या दिवशी पांढरा पेहराव करणं शुभ मानलं जातं. केवळ फॅशन म्हणून नाही तर श्रद्धेचा भाग म्हणून अनेक स्त्रिया या दिवशी पांढऱ्या रंगांची निवड करतात. 5 / 8पांढरा रंग मन एकाग्र करण्यास मदत करतो. ज्यामुळे महाशिवरात्रीच्या उपासनेत आणि ध्यानात मन अधिक रमते.6 / 8महाशिवरात्रीच्या सुमारात हवामानात बदल होऊन उष्णता वाढू लागते अशावेळी पांढरी सुती साडी शरीराला गारवा देते.7 / 8तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाची चिकनकारी, लिनन कॉटन किंवा काठापदराची साडी नेसून एक मोहक लूक मिळवू शकता.8 / 8पांढऱ्या साडीवर रुद्राक्षांच्या माळा किंवा चांदीचे दागिने अत्यंत उठून दिसतात आणि पारंपारीक लूक पूर्ण करतात.