कमळ मंगळसुत्रांचा नवा ट्रेंड-पाहा १० सुंदर डिझाइन्स-साडी आणि ड्रेस दोन्हीवर दिसते शोभून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:23 IST
1 / 10भारतीय संस्कृतीत कमळ (Lotus) हे देवी लक्ष्मीचे आसन मानले जाते. त्यामुळे कमळाचे डिझाईन्स असलेले मंगळसूत्र परिधान करणं हे सुख समृद्धी असल्याचं प्रतिक मानले जाते. (10 Designs Of Lotus Mangalsutra)2 / 10कमळाचा नैसर्गिक गुलाबी रंग दर्शवण्यासाठी अनेकदा यामध्ये पिंक सफायर किंवा रुबी यांसारख्या रत्नांचा वापर केला जातो.3 / 10लोटस मंगळसूत्र हे अधुनिक आणि पारंपारीक डिझाईन्सचा एक सुंदर संगम आहे. या मंगळसूत्रात मध्यभागी कमळाच्या फुलाच्या आकाराचे पेंडंट असते जे अत्यंत मोहक आणि सुबक दिसते.4 / 10 कमळ हे पवित्रता, सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे वैवाहिक जीवनात या गुणांचा समावेश व्हावा या उद्देशानं हे डिझाईन्स पसंत केले जातात.5 / 10कोणत्याही साध्या साडीवर तुम्ही हे मंगळसूत्र वापरू शकता. हे मंगळसूत्र पिवळ्या सोन्यात, रोज गोल्डमध्ये किंवा हिऱ्यांच्या सजावटीसह उपलब्ध असते.6 / 10 कमळाच्या पाकळ्यांवर अतिशय बारीक नक्षीकाम केलेले असते त्यामुळे ते अधिक उठावदार दिसते.7 / 10पारंपारीक काळ्या मण्यांच्या सरीमध्ये हे कमळाचे पेंडंट गुंफलेले असते जे नकारात्मकतेपासून संरक्षण करते असे मानले जाते.8 / 10 हे डिझाइन्स वजनाने हलके आणि स्मार्ट असल्यामुळे दैनंदिन वापरासाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी उत्तम पर्याय आहे.9 / 10पांरपारीक जड मंगळसूत्रांपेक्षा लोटस मंगळसूत्र दिसायला अधक ट्रेंडी वाटतं जे कोणत्याही साडीवर किंवा भारतीय ड्रेसवर शोभून दिसते.10 / 10सध्या तरूण वधू आणि महिलांमध्ये या फ्लोरल डिझाइन्सची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.