कमी ग्रॅम सोन्यात लांब मंगळसूत्र-मोठ्या पेंडंटचे २० ठसठशीत डिझाइन्स,गळ्यात शोभणारा दागिना
Updated:April 9, 2026 15:48 IST2026-04-09T15:00:29+5:302026-04-09T15:48:41+5:30
Light Weight Long Gold Mangalsutra (Latest Designs OF Gold Mangalsutra) : कमी ग्रॅममधल्या मंगळसूत्रात तुम्हाला काळेमणी आणि गोल्डन सरी यांचा सुंदर समतोल पाहायला मिळेल.

लग्नसराईत मोठ्या मंगळसुत्रांना बरीच मागणी असते. सध्या सोन्याचे भाव कमी-जास्त होत असले तरीही भारतीय परंपरेत लग्न म्हटलं की सोन्याचे दागिने वधूसाठी आणि वरासाठीही घ्यावेच लागतात. (Long Gold Mangalsutra Latest Designs)
मंगळसूत्र हा सौभाग्याचा प्रतिक असलेला दागिना महिलांसाठी खूपच जवळचा आहे. लग्नसराईत मोठ्या मंगळसूत्रांच्या नवनवीन डिझाईन्सना बरीच मागणी असते. (Long Gold Mangalsutra In Less Gram)
मोठ्या मंगळसुत्रात तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील. आजकाल कमी ग्रॅममध्ये हेवी डिझाईन्स बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे.
कमी ग्रॅममधल्या मंगळसुत्रात तुम्हाला काळेमणी आणि गोल्डन सरी यांचा सुंदर समतोल पाहायला मिळेल.
पेंडंट तुम्ही आपल्या आवडीनुसार निवडू शकता.सध्या मोठ्या पेडंटचा टेंड्र आहे. पान आकाराचे पेंडंट कमी प्रमाणात निवडले जातात.
काहीजणांना मंगळसुत्राच्या डिझाईनमध्ये काळे मणी खूप कमी हवे असतात अशावेळी तुम्ही या डिझाईनचं मंगळसूत्र बनवून घेऊ शकता.
जर तुम्हाला फार मोठं, बटबटीत मंगळसूत्र नको असेल तर तुम्ही ही सिंपल डिझाईन ट्राय करू शकता. या मंगळसुत्रातील वाट्या या साध्या तितक्याच आकर्षक आहेत.
तुम्हाला या मंगळसुत्रात तर वाट्याऐवजी इतर पेंडंट डिझाईन्स हव्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा बनवून घेऊ शकता. यात दागिना वजनानं हलरा आणि आकारानं मोठा दिसतो.
ही मंगळसूत्र एकदम राजेशाही आणि एलिगंट लूक देतात. पोकळ मणी आणि लेझर कटींग तंत्रज्ञानाचा वापर करून कमी ग्रॅममध्ये हेवी डिझाईन्सची मंगळसूत्र बनवली जातात.