लग्नसराईत गळ्यात शोभतो ठसठशीत चंद्रहार! घरंदाज मराठमोळा अलंकार-रुप चारचौघीत दिसतं देखणं
Updated:November 3, 2025 19:20 IST2025-05-30T15:14:28+5:302025-11-03T19:20:46+5:30

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे ठसठशीत दिसणाऱ्या पारंपरिक दागिन्यांना विशेष मागणी आहे. त्यापैकी चंद्रहार हा असा एक दागिना आहे जो एकच गळ्यात असला तरी पुरेसा ठरतो. इतर दागिन्यांची गरजही वाटत नाही.(latest and unique designs of chandrahaar)
हल्ली अशा प्रकारचे चंद्रहार गळ्यातल्याचे कित्येक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.
तुमचं बजेट जास्त असेल तर असा दागिना तुम्ही सोन्यातही घडवून घेऊ शकता. साधारण दोन ते अडीच तोळ्यांच्या पुढेच चंद्रहार मिळतो.
हल्ली मोत्याच्या चंद्रहारचाही ट्रेण्ड आहे. काठपदर साडीवर मोत्याचा चंद्रहारही खूप खुलून दिसतो.
असे चंद्रहार खूप कमी वजनात तयार होतात. त्यावरची फुलंच फक्त अस्सल सोन्याची असतात. त्यामुळे अगदी काही ग्रॅममध्येही तुम्ही हे डिझाईन तयार करून घेऊ शकता.
खूप हेवी लूक देणारा चंद्रहार आवडत नसेल तर हे एक नाजूक डिझाईन पाहा.
चंद्रहारचा हा एक वेगळा प्रकार. इथे पेंडंट ऐवजी लक्ष्मीची मुर्ती वापरण्यात आली आहे. असं काही वेगळं आवडत असेल तर अशा पद्धतीचेही कित्येक डिझाईन्स मिळू शकतात.
काळे मणी वापरून असा चंद्रहार तयार करून घेतला तर तो मंगळसूत्रासारखाही घालता येतो.