By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:49 IST
1 / 12लग्नसराईत मोठ्या आणि छोट्या मंगळसुत्रांना बरीच मागणी असते. मोठ्या आणि छोट्या मंगळसुत्रांचा सेट तुम्हाला खास लूक देईल. (Small And Big Mangalsutra Set)2 / 12 रोज वापरण्यासाठी लहान मंगळसूत्र आणि कुठे बाहेर जाण्यासाठी मोठं मंगळसूत्र हे कॉम्बिनेशन प्रत्येक महिलेकडे तुम्हाला दिसेलच. (Latest Mangalsutra Designs)3 / 12 साडी नेसल्यानंतर छोट्या आणि मोठ्या मंगळसुत्राचे कॉम्बिनेशन एक पारंपारीक लूक आणि मॉडर्न टच देईल.4 / 12मंगळसुत्राचे हे नवीन पॅटर्न्स तुमच्या साडी लूकची शोभा वाढवतील. या मंगळसुत्रात तुम्ही हव्यातशा पेंडंटची निवड करू शकता.5 / 12जर मोठं मंगळसूत्र वाटीच्या पेंडंटचे असेल तर छोटं मंगळसूत्र तुम्ही स्टायलिश डिजाईनचं जसं की हॉर्ट शेप, ट्रँगल शेपचं बनवू शकता.6 / 12 ५ ते ६ ग्रॅममध्ये तुम्हाला नाजूक नवीन डिझाइनचं छोटं मंगळसूत्र मिळेल तर १५ ते २० ग्रॅममध्ये तुम्ही मोठं मंगळसूत्र बनवून घेऊ शकता.7 / 12मंगळसुत्रात नाजूक पट्ट्या किंवा बारीक लेससारख्या डिझाईन्स तुम्हाला सुंदर लूक देतील.8 / 12मंगळसुत्रांचे सुंदर डिझाईन्स तुम्हाला कमीत कमी ग्रॅमममध्ये बनवून घेता येतील. काळ्या मण्यांची संख्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता.9 / 12जर तुम्हाला आर्टिफिशयल मंगळसुत्रांचे सेट्स हवे असतील तर त्यातही तुम्हाला बरेच पर्याय मिळतील.10 / 12सध्या फ्लोरल आणि ज्यॉमेट्रिक डिझाईन्स खूपच चर्चेत आहेत. सोन्यासोबतच रोज गोल्ड आणि प्लॅटिनममधील मंगळसुत्रही बाजारात उपलब्ध आहेत.11 / 12लग्नासाठी जड आणि लांब मंगळसूत्र घ्या. तर प्रवासासाठी किंवा रोजच्या कामासाठी लहान आणि लाईटवेट मंगळसूत्र सोयीचे ठरते.12 / 12जर तुमचा चेहरा गोल असेल तर लांब मंगळसूत्र तुम्हाला शोभून दिसेल. जर चेहरा लांबट असेल तर आखूड किंवा गळ्यालगतचे मंगळसूत्र निवडावे.