1 / 7सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे ज्यांची लग्न आता होणार आहेत, त्या तरुणी सध्या लेटेस्ट डिझाईन्सच्या स्टायलिश मंगळसूत्रांच्या शोधात असणार. म्हणूनच हे काही डिझाईन्स पाहा. तुमच्या मॉडर्न लूकवर हे डिझाईन्स खूप शोभून दिसतील. 2 / 7हल्ली अशा कस्टमाईज पेंडंट डिझाईनची क्रेझ आहे. तुमच्या किंवा तुमच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाचे सुरुवातीचे अक्षर घेऊन तुम्ही असं पेंडंट तयार करून घेऊ शकता.3 / 7अमेरिकन डायमंड किंवा रियल डायमंडचं एक लहानसं पेंडंट आणि काळे मणी असं डिझाईनही खूप डिसेंट वाटतं.4 / 7हे बघा एकदम नव्या पद्धतीचं आणि हटके मंगळसूत्र... कोणत्याही वेस्टर्न कपड्यावर हे अगदी सहज चालून जाईल.5 / 7काळे मणी खूप आवडत नसतील तर असं एखादं डिझाईन घेऊ शकता. याचं पेंडंटही सुरेख आहे.6 / 7चौकोन, त्रिकोण, आयात, लंबगोल असे भौमितिक आकार असणाऱ्या Geometric pattern मंगळसूत्राचीही सध्या फॅशन आहे. 7 / 7नव्या स्टाईलचं मंगळसूत्र शोधत असाल तर हे डिझाईन तुम्हाला आवडू शकतं.