Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ओल्ड फॅशन गोल गळा नको गं बाई; ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे १० ट्रेंडींग डिजाईन्स, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:30 IST

1 / 10
आजकाल ब्लाऊजचे पुढचे गळे गोल गळे टिपिकल, ओल्ड फॅशनचे वाटतात म्हणून कोणीही शिवत नाही. तुम्हीसुद्धा ब्लाऊजचा गळा गोल न शिवता या स्टाईलचे ब्लाऊज शिवू शकता. (Latest Front Neck Blouse Designs)
2 / 10
ब्लाऊजच्या पुढच्या गळ्यासाठी तुम्ही हे नवीन डिझाईन्स तुम्ही टेलरकडून शिवून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फार खर्चही लागणार नाही आणि ब्लाऊजला नवीन लूक येईल. (Top 10 Trending Front Neck Blouse Designs)
3 / 10
असे युनिक डिझाईन्सतुम्हाला टेलरच्या कॅटलॉगमध्येही सापडणार नाहीत. सेलिब्रिटीसुद्धा आजकाल अशा प्रकारचेच गळे शिवतात.
4 / 10
लग्नसराईसाठी किंवा पार्टी फंक्शनसाठी तुम्ही या पद्धतीचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
5 / 10
आजकाल मागे दोरी बांधण्याची फॅशन ट्रेंडीग आहे. काठापदराची साडी असो किंवा साधी शिफॉन, जॉर्जेट साडी कशावरही असं ब्लाऊज मस्त दिसतं.
6 / 10
जर तुम्ही फुल स्लिव्हजचं ब्लाऊज शिवणार असाल तर असा ब्रॉड गळा शिवू शकता.
7 / 10
पंचकोनी गळा पुढच्या बाजूला शिवण्यासाठी एक उत्तम चॉईस आहे. पंचकोनी गळा शिवल्यास ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट रंगाची पायपिंग करून घ्या.
8 / 10
डिप व्ही नेक गळा हा खूपच हॉट आणि उठून दिसतो. कॉटनच्या साड्यांसाठी तुम्ही अशा प्रकारचा गळा शिवून घेऊ शकता.
9 / 10
मागचा गळा बंद ठेवून पुढच्या गळ्याचा असा पॅटर्न शिवल्यास तुमचा लूक खुलून येईल आणि सुंदर दिसाल.
10 / 10
ही स्टाईल सध्या नवीन आहे. क्रॉप टॉपप्रमाणे तुम्ही असं ब्लाऊज स्टाईल करू शकता. जर असं ब्लाऊज शिवणार असाल तर पुढे प्लेन आणि हातांवर वर्क किंवा डिझाईन्स असल्यास उत्तम दिसेल.
टॅग्स : खरेदीफॅशन